19.5 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeलातूरअभिजात मराठी भाषेमुळे  रोजगाराच्या अनेक संधी निर्माण 

अभिजात मराठी भाषेमुळे  रोजगाराच्या अनेक संधी निर्माण 

लातूर : प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी विषायचे अध्यापन करणा-या विद्यार्थ्यांना प्रशासन, स्पर्धा परीक्षा, दूरदर्शन, भाषांतर, मुद्रित, दृक, दृक-श्राव्य माध्यमे तसेच सृजनशील लेखन, संवादकौशल्य, प्रकाशन व्यवसाय आदींमध्ये रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या आहेत, असे प्रतिपादन डॉ. अशोक नारनवरे यांनी केले.
शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय व भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व ‘३६ जिल्हे ३६ मार्गदर्शन सत्रे’अतंर्गत ‘मराठी भाषा: रोजगाराच्या संधी’ या विषयावर प्रा. डॉ. नारनवरे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे हे होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सदाशिव शिंदे,  थोर विचारवंत डॉ. नागोराव कुंभार, बाबासाहेब जगताप,  चिंतामण होण्या वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. अशोक नारनवरे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने ही भाषा राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे किंबहुना मराठी भाषेतील सर्वोत्तम साहित्याचे अनुवादही होताना दिसते आहे. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे म्हणाले की, अभिजात भाषा ही जगातील निवडक १० भाषेतील एक भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड न बाळगता तिच्या बद्दलचा सार्थ अभिमान प्रत्येकालाच असला पाहिजे. प्रास्ताविक डॉ. सभांजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार डॉ. सुदर्शन पाटील यांनी मानले. या कार्यक्रमात प्रा. विश्वनाथ पांचाळ, प्रा. रियाज शेख, प्रा. पूजा राठोड, डॉ. गोविंद उफाडे, प्रा. बापू जवळेकर, डॉ. शिवराज काचे यांच्या सह महाविद्यालयाती बहुसंख्य विद्यार्थ्यांची व विद्यार्थ्यांनीची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR