मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ट्रॅफिक जाम झाले आहे, कित्येकांच्या घरात पाणी शिरले आहे. अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींनाही या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. आलिशान घरात राहणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरातही पावसाचं पाणी गेलं आहे. अगदी बिग बी अमिताभ बच्चन हेसुद्धा याला अपवाद ठरले नाहीत.
अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातही पाणी घुसले आहे. ज्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हीडीओमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या गेटच्या आतमध्ये पाणी गेल्याचे दिसत आहे. व्हीडीओत पाहिलं तर अमिताभ बच्चन यांचा हा ‘जनक’ बंगला आहे. जो मुंबईतील जुहू परिसरात आहे. बच्चन कुटुंब सध्या राहत असलेल्या त्यांचा मुख्य ‘जलसा’ या बंगल्यापासून काही अंतरावरच त्यांचा ‘जनक’ हा बंगला आहे. हा बंगला आता पाण्यात बुडालेला दिसतो आहे.
माहितीनुसार, अमिताभ यांचा ‘जनक’ बंगला प्रामुख्याने त्यांचे ऑफिस आणि पर्सनल जिम म्हणून वापरला जातो. इथे त्यांच्या फिल्मशी संबंधित मीटिंग होतात. ते मीडिया किंवा नातेवाईकांना भेटतात.
















