किल्लारी : वार्ताहर लातूर ते निलंगा महामार्गावर चलबुर्गापाटी जवळ कांचन हॉटेलजवळ चौदा गोवंश पशुधन अवैधरित्या कत्तलखान्याकडे जात असताना गोरक्षणच्या कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे किल्लारी पोलिसांनी वाहनासह तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१४ गोवंश अवैध वाहतुकीच्या मार्गाने कत्तलीसाठी जात असल्याची माहिती कळल्यावरून जावळी (ता औसा), उमरगा, लातूर येथील कार्यकर्त्यानी बैल वहातुकीचा कंटेनेर (के. ए. ३८-अ- ७२६५) आडवून पाहाणी केली आसता एकूण १४ बैल वाहनात निर्दयीपणे नेले जात असल्याचे आढळून आले. ते कत्तलीसाठी बिदरला घेऊन जात आसल्याची माहिती मिळाली वरून ११२ ला फोन केला. यानंतर किल्लारी पोलीस ठाण्याचे सपोनी शहाणे यांच्या आदेशावरून ठाणे आमलदार गायकवाड नामदेव यांनी पोलीस गाडी देऊन चालक लोंढे धम्मपाल पोहेकाँ पंढरीनाथ सोमवंशी याना पाठवले. तेथे गोरक्षकचे ८ ते दहा कार्यकर्ते व अवैध वाहतूक करणा-या अरोपीमध्ये झटपट झाल्याचे समझते. तेथे हा कंटेनेर औसा पोलिस ठाण्यास घेऊन चला म्हणून पोलिसावर दबाव टाकण्यात आला. कंटेनेर औसाकडे घेऊन जात असताना आसताना पोलीस चालक लोंढे धम्मपाल यांनी समयसूचकता ओळखून औसा पोलीसाना माहिती देऊन मदत मागितली आसता औसाचे पोलीस व होमगार्डसहीत तेथे १४ जण येऊन कंटेनर ताब्यात घेऊन कंटेनर किल्लारी पोलीसाच्या ताब्यात दिला.
या प्रकरणी बळी गोविंद मुळे रा.जावळी (ता औसा) यांच्या फिर्यादीवरून अरोपी चालक यल्लापा शहानाप्पा, मदतनीस व्यकंट लक्ष्मण बुई, मुजीब कुरेशी, मुन्ना कुरेशी, तोशीन कुरेशी रा.औसा यांच्या विरोधात कलम ११५(२)३(५) सहकलम ५ ( अ) ५ ( ब) ९ महाराष्ट्र प्राणी रक्षण नियम१९७६ व सह कलममान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १४ बैल किमत ३ लाख २ हजार व कंटेनीअरची किमत दहा लाख असा एकूण तेरा लाख दोन हजारांचा माल जप्त केला असून अधिक तपास पिएसआय गोपाळ शिंदे हे करीत आहेत हे बैल रिंगणी ता. औसा येथील गोरक्षणकडे सुपूर्द करीत आसल्याचे सपोनी शहाणे यांच्या आदेशावरून पिएसआय गोपाळ शिंदे यानी सांगीतले.

