सामना पाहण्यासाठी विनोद कांबळी वानखेडेवर

मुंबई : प्रतिनिधी
आयपीएल २०२६ चा ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला. दोन्ही संघांनी २०० पेक्षा जास्त धावांचा टप्पा ओलांडला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात अखेरीस सनरायझर्स हैदराबाद विजयी ठरला. मात्र, त्यानंतर निर्माण झालेल्या उत्साहाचा सर्वांनी आनंद घेतला. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट डावखुरा फलंदाज विनोद कांबळीनंही स्टेडियममध्ये उपस्थित राहत सामन्याचा पुरेपूर आनंद घेतला.

विनोद कांबळी स्टेडियममध्ये दाखल होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, विनोद कांबळी दोन लोकांच्या मदतीने स्टेडियमच्या दिशेने चालताना दिसला. यावेळी, त्याचे चाहते त्याच्या तब्येतीची विचारपूस करताना आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची विनंती करताना दिसले. तसेच चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छाही दिल्या.
अलीकडेच, विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याची बातमी समोर आली होती. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून कांबळीची प्रकृती खालावत आहे. सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळीला डिसेंबर २०२४ मध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्याच्या समस्यांव्यतिरिक्त, विनोद कांबळी आर्थिक अडचणींचाही सामना करत आहे.

विनोद कांबळीने पहिल्यांदाच आयपीएल २०२६ चा सामना पाहिला. त्यानं पाहिलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला ६ गडी राखून पराभूत केलं. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, रायन रिकेल्टनच्या शतकामुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ५ गडी गमावून २४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, हेनरिक क्लासेन, ट्रॅविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या फळंदाजीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने एक षटक शिल्लक असतानाच २४४ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16
Video thumbnail
Latur|भूकंपग्रस्ताची तहसीलदारांकडून हेळसांड? न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
01:38
Video thumbnail
Latur|अहिल्यादेवी जयंती न साजरी केल्याने ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
03:57
Video thumbnail
RCC CLASSES|फी परत करा, परवाना रद्द करा; RCC विरोधात हजारोंच्या आंदोलनाचा इशारा
01:27
Video thumbnail
सोलापुरात विषारी मद्यविरोधात प्रशासनाची धडक कारवाई; २४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण
03:08
Video thumbnail
मोहोळ-वैराग रस्ता रुंदीकरण: मोबदल्याशिवाय काम नको! बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; हायकोर्टात धाव
02:23
Video thumbnail
Latur|तहसीलदारांसमोरच अंगावर पेट्रोल ओतल्याने खळबळ;पाच महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित असल्याचा आरोप
01:56
Video thumbnail
Shivraj Motegavkar|कुलकर्णीच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर;मोटेगावकरच्या इमारतीवर कारवाई कधी?"
02:48
Video thumbnail
Latur Airport|लातूर विमानतळ विकासाला गती; उद्योग-पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा
03:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये भोंदूबाबाचा भांडाफोड;खोपेगावातील कथित बाबाचा दरबार बंद
03:01

Latest news