32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeसोलापूरआंतरराष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलच्या श्रावणी सूर्यवंशीला रौप्य पदक

आंतरराष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलच्या श्रावणी सूर्यवंशीला रौप्य पदक

सोलापूर-

आंतरराष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने हायबोर्ड डायव्हिंगमध्ये रौप्य पदक पटकाविले.

नवी दिल्ली येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जलतरण तलाव संकुल येथे झालेल्या या स्पर्धेत श्रावणीने २३४ गुण मिळवित ही कामगिरी केली. २० वर्षांखालील गटात झालेल्या या स्पर्धेत थायलंडच्या डायव्हरने २४१.३५ गुण मिळवित सुवर्ण पटकाविले. श्रावणी येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली घडली.

२०१८ मधील चौथ्या शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा जल स्पर्धा घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने बिमस्टेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. यात भारतासह बांगलादेश, भूतान, नेपाळ श्रीलंका, म्यानमार आणि थायलंड या देशांतील २६८ खेळाडूंनी भाग घेतला आहे. याम ध्ये जलतरण, वॉटर पोलो आणि डायव्हिंग या तीन प्रकारामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये ३९ पदके आणि ९ ट्रॉफी दिल्या जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR