आज, उद्या व्हॉईस ऑफ मीडियाचे महिला पत्रकारांसाठी राज्य अधिवेशन

लातूर : प्रतिनिधी
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, महाराष्ट्र महिला विंगच्या वतीने राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचे आयोजन दि. २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी थोरमोटे लॉन्स, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले आहे. महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरण या विषयांवर या दोन दिवसीय अधिवेशनात विचारमंथन होणार आहे.
७८ देशांमध्ये विस्तारलेल्या आणि ७ लाख ४० हजारांहून अधिक पत्रकारांना जोडणा-या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या संघटनेच्या महिला विंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील महिला पत्रकारांना एकत्र आणून संघटनात्मक बळकटीकरण, प्रश्नांची मांडणी आणि आगामी वर्षासाठी कृती आराखडा निश्चित करण्याचे नियोजन आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के अध्यक्षस्थानी असतील, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका व शिक्षणतज्ज्ञ सुनंदा पवार उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. गोदावरी बँक समूहाच्या अध्यक्षा महिला संघटक राजश्री पाटील आणि प्रसिद्ध टीव्ही अँकर व पत्रकार फराह खान यांची विशेष उपस्थिती असेल. सुनंदा पवार आणि राजश्री पाटील यांची फराह खान प्रगट मुलाखत घेणार आहेत.
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी समारोप सत्रात प्रा. डॉ. आशा देशपांडे या ‘पत्रकारितेतील महिलांचे स्थान आणि अपेक्षित बदल’ या विषयावर, तर डॉ. कविता राणे या ‘माझी स्वतंत्र पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार  आहेत.  लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, लातूर शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त वसुधा फड, डी वाय एस पी भगीरथी पवार, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात महिला पत्रकारांच्या समस्या, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सुरक्षा, आरोग्य विमा, समान संधी, डिजिटल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय, सायबर सुरक्षा आणि तथ्य पडताळणी यांवर चर्चा होईल. तसेच २० महत्त्वपूर्ण ठराव मांडणे, जिल्हानिहाय कामाचा आढावा घेणे, प्रशिक्षण व कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करणे आणि मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची दिशा निश्चित केली जाणार आहे. ‘महिला पत्रकारांचा सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन हे केवळ चर्चेचे विषय न राहता त्यासाठी ठोस कृती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील महिला पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ देणे, संघटनात्मक एकजूट मजबूत करणे आणि वर्षभरासाठी कृतीशील कार्यक्रम निश्चित करणे, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील निमंत्रित महिला पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सक्षमीकरणाच्या चळवळीला बळ द्यावे,’ असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, प्रमुख वैशाली पाटील यांनी केले.
अधिवेशनाच्या आयोजनात राष्ट्रीय महिला संघटक रश्मी मारवाडी, विभागीय प्रदेशाध्यक्ष रोशनी बैस व सोनल महाडिक यांच्यासह महिला विंगचे राज्यस्तरीय पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सहभागी आहेत. महिला पत्रकारितेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी बनवण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजक वैशाली पाटील यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Crime News|लातूर–जहीराबाद महामार्गावर खळबळ! पोत्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
01:26
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये HomeLane च्या पहिल्या Experience Centre चं उद्घाटन | AI Home Interiors
08:24
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी ६२% मतदान | ४१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत
01:36
Video thumbnail
Nanded News|नांदेडमध्ये चारा तस्करी उघड! दोन ट्रक जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
04:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये ‘लखन मेकअप’चं शानदार उद्घाटन | वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
02:50
Video thumbnail
Latur Graduate Constituency Election | दुपारी १२ पर्यंत १९.३३% मतदान | Latur News
06:48
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये जबरदस्ती कर्जवसुलीविरोधात भीम आर्मी आक्रमक
03:39
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात उदगीरमध्ये २५ तारखेला एल्गार आंदोलन
03:05
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये घरेलू महिला कामगारांचा एल्गार! विविध मागण्यांसाठी गांधी चौकात धरणे आंदोलन
06:46
Video thumbnail
Latur News|दुष्काळात हसेगावच्या सेवालायाचा पुढाकार! १०० गायींच्या संगोपनासाठी गो-सेवालय
07:47
Video thumbnail
लातूरच्या बाभळगावातील दसरा मेळावा LIVE
00:00
Video thumbnail
Parbhani News|ताडकळसमध्ये हरणाच्या पाडसावर कुत्र्यांचा हल्ला; शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मदत
01:18
Video thumbnail
Nanded News|आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला रोहित पवारांचा आधार
05:38
Video thumbnail
Latur News|निलंगेकर बंधूंवर अभय साळुंके यांचा गंभीर आरोप! विक्टोरिया कंपनी प्रकरणाची कागदपत्रे सादर
03:36
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये अजय देहाडे यांच्या भीमगीतांची मेजवानी! भीमसैनिकांचा उत्साह शिगेला
08:44

Latest news