आता एस. बी. आय. इन्श्युरन्स कंपनीकडून अपेक्षा!

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात एकुण ६० महसूल मंडळं आहेत. या सर्वच महसूली मंडळांत गतवर्षी अतिवृष्टीने शेतक-यांचे खुप मोठे नूकसान केले होते. खरीप हंगामात शेतक-यांच्या हाती काहींच लागले नाही. त्यामुळे किमान पीकविमा तरी मिळेल या आशेपोटी जिल्ह्यातील शेतक-यांनी पीकविमा भरला. आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीने लातूर जिल्ह्यातून ११८ कोटी रुपये पिकविम्याची रक्कम जमा केली. परंतु, पीकविमा ६० महसूल मंडळातील शेतक-यांना देण्याऐवजी केवळ ४ महसूल मंडळात १९ कोटी  रुपयांचा पीकविमा वाटला. ५६ महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना वा-यावर सोडून आयसीआयसी लोबार्ड कंपनीने शेतक-यांचेच १०० कोटी रुपये लुबाडल्याचे समोर आले आहे. आता सन २०२६-२७ या वर्षापासून शासनाने खरीप हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ही योजना एस. बी. आय. जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे या कंपनीने तरी शेतक-यांचे भले करावे, अशी अपेक्षा आहे.
योजनेंतर्गत ७० टक्के जोखीमस्तरावर विविध प्रमुख पिकांसाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि शेतक-याने भरावयाचा विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीनसाठी ६२ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कमेवर १ हजार २५० रुपये हप्ता, कापसासाठी ६२ हजार रुपये संरक्षित रक्कमेवर १ हजार ५४३.८० रुपये  हप्ता, खरीप ज्वारीसाठी ३३ हजार रुपये संरक्षित रक्कमेवर ६६० रुपये हप्ता, तर बाजरीसाठी ३२ हजार रुपये संरक्षित रक्कमेवर ६४० रुपये हप्ता शेतक-यांना भरावा लागेल.
तसेच तूर पिकासाठी ४७ हजार रुपये रक्कमेवर ९४० रुपये, मूग पिकासाठी ३० हजार रुपये रक्कमेवर ४५० रुपये
आणि उडीद पिकासाठी २७ हजार  रुपये विमा संरक्षित रक्कमेवर ४०५ रुपये प्रति  हेक्टर विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतक-यांनी शेवटच्या टप्प्यात गर्दी किंवा घाईगडबड न करता वेळेत आपल्या अधिसूचित पिकांच्या विमा संरक्षणासाठी नजीकच्या बँकेत अथवा नागरी सुविधा केंद्रांमार्फत  अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. या योजनेचा सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक  २०२६०७०३१९३८३१०००१ असा  आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
00:00
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56
Video thumbnail
Latur|औसा अतिक्रमणाच्या विळख्यात; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव!
03:45
Video thumbnail
Latur|लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच! बुद्ध विहाराला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र
03:17
Video thumbnail
Latur|४०वर्षे विकासाचा वनवास; नागरिकांचा संताप अनावर!प्रबुद्धनगर, महादेवनगर, कॉलनीची दयनीय अवस्था
03:42
Video thumbnail
Parbhani|परभणीत भरदिवसा जीवघेणा हल्ला;साक्ष न देण्याच्या वादातून भरदिवसा रक्तरंजित हल्ला!
03:31
Video thumbnail
Latur|शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Dharashiv|टायगर ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; १,००० विद्यार्थ्यांना शालेय पॅडचे वाटप
01:40
Video thumbnail
रोनाल्डोच्या विश्वचषक प्रवासाचा भावुक शेवट; पोर्तुगालला पराभूत करत स्पेन पुढे सरकला
00:36
Video thumbnail
आषाढी वारी: संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून रवाना; उद्या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
00:37
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये एक्सपायरी बदलून शेती औषधांचे वितरण? मोठा गौप्यस्फोट
01:08

Latest news