लातूर पोलिसांनी शेतक-यांना हक्काचे ५ बैल परत मिळवून दिले

लातूर : प्रतिनिधी
स्वत:च्या मालकीचे बैल असूनही न्यायालयाचे आदेश हातात घेऊन एका गोशाळेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारावे लागणा-या दोन शेतक-यांना अखेर लातूर पोलिसांनी न्याय मिळवून दिला. न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानणा-या गोशाळा व्यवस्थापनास कायद्याचे पालन करण्यास भाग पाडत शेतक-यांच्या मालकीचे पाचही बैल परत मिळवून देण्यात आले.
पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा क्र. ११४/२०२६ अंतर्गत प्राणी छळ प्रतिबंध अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात शेतकरी बळीराम नारायण भालेराव व दिनेश आबासाहेब कातळे, रा. रेणापूर यांच्या मालकीचे पाच बैल कायदेशीर प्रक्रियेनंतर परभणी जिल्ह्यातील राणीसावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेत ठेवण्यात आले होते.
संबंधित शेतक-यांनी न्यायालयात अर्ज केल्यानंतर  न्यायालयाने जनावरांच्या देखभालीचा खर्च जमा करून बैल तात्काळ परत करण्याचा स्पष्ट आदेश दिला. मात्र न्यायालयाचा आदेश असतानाही गोशाळा व्यवस्थापनाने बैल परत देण्यास नकार दिल्याने शेतक-यांनी अतिरिक्त सत्र न्यायालय, लातूर येथे धाव घेतली. तेथूनही पूर्वीच्या आदेशाची पुनरावृत्ती करून बैल परत करण्याचे निर्देश देण्यात आले. तरीदेखील जनावरांच्या देखभाल खर्चापोटी अतिरिक्त पैशांची मागणी करत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी टाळण्यात आली.
शेवटी हताश झालेल्या शेतक-यांनी थेट पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतक-यांची पावसाळ्यातील शेतीकामाची निकड लक्षात घेत तांबे यांनी रेणापूर पोलीस ठाण्याला तातडीने कारवाईचे आदेश  दिले.  या आदेशानुसार रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इगे यांनी संबंधित शेतक-यांसह प्रत्यक्ष परभणी जिल्ह्यातील गोशाळेत जाऊन न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली. पोलिसांच्या ठाम आणि कायदेशीर भूमिकेमुळे गोशाळा व्यवस्थापनाला अखेर दोन्ही शेतक-यांचे पाचही बैल परत द्यावे लागले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
00:00
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56
Video thumbnail
Latur|औसा अतिक्रमणाच्या विळख्यात; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव!
03:45
Video thumbnail
Latur|लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच! बुद्ध विहाराला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र
03:17
Video thumbnail
Latur|४०वर्षे विकासाचा वनवास; नागरिकांचा संताप अनावर!प्रबुद्धनगर, महादेवनगर, कॉलनीची दयनीय अवस्था
03:42
Video thumbnail
Parbhani|परभणीत भरदिवसा जीवघेणा हल्ला;साक्ष न देण्याच्या वादातून भरदिवसा रक्तरंजित हल्ला!
03:31
Video thumbnail
Latur|शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Dharashiv|टायगर ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; १,००० विद्यार्थ्यांना शालेय पॅडचे वाटप
01:40
Video thumbnail
रोनाल्डोच्या विश्वचषक प्रवासाचा भावुक शेवट; पोर्तुगालला पराभूत करत स्पेन पुढे सरकला
00:36
Video thumbnail
आषाढी वारी: संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून रवाना; उद्या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
00:37
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये एक्सपायरी बदलून शेती औषधांचे वितरण? मोठा गौप्यस्फोट
01:08

Latest news