आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ

मुंबई : ‘दिशा सालियानच्या मृत्यूबाबत वडिलांनी संशय व्यक्त केला होता, तर पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? अपघाती मृत्यूचे प्रकरण का दाखल केले? कोणत्या बाबींमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यापासून रोखण्यात आले?’ असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित केला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. चौकशीअंती दिशाने जीव दिल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी याचिका करून आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप केला आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंतीही सालियन यांनी अ‍ॅड. निलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे.

याविषयी न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बाजू मांडली. शिशिर हिरे यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची नोंद ‘अपघाती मृत्यू’ अशी करण्यात आली होती आणि दोनदा चौकशी करण्यात आली; दोन्ही वेळा तिने जीव दिल्याचेच निष्पन्न झाले. या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांवरूनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाला, असे ते म्हणाले.

फोटोनुसार दिशाच्या डोक्याला दुखापत
न्यायालयाच्या खंडपीठाने असाही प्रश्न उपस्थित केला की, शवविच्छेदन अहवालानुसार, इतक्या उंचावरून पडूनही संबंधित व्यक्तीच्या शरीरावर कोणतीही दुखापत का आढळली नाही. जर एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या उंचीवरून खाली पडली, तर तिच्या शरीरावर काहीच जखमा होणार नाहीत का? असा प्रश्न न्यायमूर्ती डांगरे यांनी विचारला. त्यावर हिरे यांनी सांगितले की, छायाचित्रांनुसार संबंधित व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली होती. पुढील सुनावणी २४ ऑगस्टला आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news