लातूर : प्रतिनिधी
लातुर मतदार संघात असा एकही बूथ नाही जेथील व्यक्तीला डॉ. शिवाजी काळगे यांनी आपली वैद्यकीय सेवा दिली नाही. आपण माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना निवडून दिले, लोकनेते विलासराव देशमुख यांना निवडून दिले आणि या नेत्यांनी आपल्या लातूरचे नाव आपल्या कार्यातून देश पातळीवर नेले. त्यांची परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथालातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख केले.
लातुर लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ बुधवार दि.२४ मार्च रोजी सायंकाळी लातूर पंचायत समिती सर्कलमधील आर्वी येथे बापू चव्हाण यांच्या निवासस्थानी माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुसंवाद बैठक झाली. या बैठकीला आर्वी, कासारगाव, हणमंत वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातुर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख आणि लातुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचे महिला भगिनीनी आर्वी गावात येताच औक्षण केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकसभा निवडणूक २०२४ ही देशाची निवडणूक आहे पण या निवडणुकीत प्रश्न कोण सोडविणार याचा विचार आपण करून मतदान करावे आणि असा माणूस म्हणजे डॉ. शिवाजी काळगे आहेत. लातूर मतदारसंघात असा एकही बूथ नाही जेथील व्यक्तीला डॉ.शिवाजी काळगे यांनी आपली वैद्यकीय सेवा दिली नाही. आपण माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना निवडून दिले, लोकनेते विलासराव देशमुख यांना निवडून दिले आणि या नेत्यांनी आपल्या लातूरचे नाव आपल्या कार्यातून देश पातळीवर नेले. त्यांची परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी निवडून दयावे असे आवाहन यावेळी केले.
विद्यमान सरकारने शेती मालाला चांगला भाव देण्यात येईल असे आश्वासन दिले होते पण तसे गेल्या १० वर्षात झाले नाही. सामान्य माणसाला केंद्रंिबदू मानून सेवभावाने काम करण्याची शिकवण लोकनेते विलासराव देशमुख यांनी दिली तीच शिकवण पुढे नेण्यासाठी आम्ही काम करीत आहोत आणि त्यामुळेच लातुरचे नाव आज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. मांजरा परिवारातील साखर कारखान्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर सुखकर जीवन आपल्या कुटुंबियांसमवेत व्यतीत करीत आहे. आपल्या लातूरचे नाव आणखी पुढे नेण्यासाठी आपल्याला आपले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवावे लागेल आणि यासाठी आपल्याला कामाला लागले
पाहिजे.
आर्वीचे प्रश्न आपण आजतागायत सोडविण्यासाठी प्रयत्न केले यापुढेही आणखी काही शिल्लक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी डॉ शिवाजी काळगे एक तुफान असल्याप्रमाणे सर्वत्र फिरत असून या तुफानाचा सामना कसा करावा हे विरोधकाना सुद्धा समजत नाहीये आणि म्हणून या तुफानाला आपण साथ द्यावी व भरघोस मतांनी दिल्लीत पाठवावे असे आवाहन उपस्थित आर्वी ग्रामस्थांना आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले. यावेळी लातुर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण जाधव, तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, सर्जेराव मोरे, बाजार समिती उप सभापती सुनील पडिले, गुरुनाथ अप्पा रनखांब, कैलास भोसले यांच्यासह विविध सोसायटी सदस्य, आर्वी व परिसरातील ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.