आम्ही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; महाराष्ट्राच्या दादा-वहिनींचा विद्यार्थ्यांना पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी
जगभरातून ‘नीट’ परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात विद्यार्थी आणि पालकांकडून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. आता विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची लाडकी जोडी अभिनेते रितेश विलासराव देशमुख आणि जिनिलिया रितेश देशमुख यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ‘आम्ही आमच्या देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. तो आवाज बुलंद, स्पष्ट आणि निर्भय असावा. तेच आपल्या लोकशाहीचा प्राण आणि आपल्या राष्ट्राच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. चला, आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊया, त्यांना पाठिंबा देऊया आणि त्यांना सक्षम करूया. आपल्या तरुणांची ऊर्जा, धैर्य आणि स्वप्नेच त्या भारताला आकार देतील, ज्याची निर्मिती करण्याचे स्वप्न आपण पाहतो. जय हिंद!

दिल्लीत जंतर-मंतर येथे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने जोरदार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला सामान्य जनतेपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यात शबाना आझमी, सयाजी शिंदे, अतुल कुलकर्णी, झीनत अमान, प्रकाश राज, हेमंत ढोमे, स्वरा भास्कर अशा अनेक मराठी आणि बॉलिवूडच्या कलाकारांचा समावेश आहे.

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यावर अभिजीत दीपके उपोषणाला बसले होते. मात्र नंतर सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून अभिजीत दिपके याने उपोषण मागे घेतले. २० जुलैला जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी, पालक आणि नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. तेव्हा पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला.
‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेली अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा रद्द करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. सोनम वांगचुक यांनी २८ जून २०२६ रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे हे उपोषण सुरू केले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news