किल्लारी : वार्ताहर
महेश उस्तुरे ही लढाई सरसकट आरक्षणाची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज स्वस्त बसणार नाही. गेल्या ७० वर्षांपासून शासनाने समाजाची फसवणूक केली आहे. आरक्षण मिळाल्याने मराठा समाजातील घराघरातील लेकरांचे कल्याण होईल. ही लढाई सर्व मराठा समाजाने ताकदीने लढून ंिजंकायचीच आहे. पुढील काळात गरज भासली तर राज्यभर आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. राजकारणाचे ऐकून समाजात फूट पाडू नका. आपल्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या आहेत. त्यामुळे सरसकट आरक्षण मिळविण्यासाठी मरण आले तरी आता माघार नाही, असे प्रतिपादन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
किल्लारी येथील जाहीर सभेत ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज ताकतीने एक झाला तर रात्रंदिवस ऊन वारा थंड न पाहता आरक्षणासाठी झगडत राहिला तरच २४ डिसेंबर पर्यंत सरसकट समाजाला आरक्षण मिळेल. मराठा आरक्षण हे सरकारच्या निरीक्षणाच्या प्रक्रियेत आहे. मराठा समाज करोडोच्या संख्येने एक झाला आहे म्हणूनच मराठ्यांच्या नोंदी सापडत आहेत आज पर्यंत ३५ लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत. त्या आधारेच इतर पावणे दोन कोटी मराठी समाजाला याचा लाभ मिळणार मिळणार आहे. जरांगे पाटील म्हणाले की, काही राजकारणी ओबीसी व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वेगवेगळी वक्तव्य करीत आहेत.
मराठा व ओबीसी समाजाने अशा नेत्यांच्या वक्तव्याला बळी पडू नये. मराठा समाजाने गावोगावी जाऊन जनजागृती करावी. आपल्या समाजाच्या ज्या नेत्यांना आपण मोठे केले पक्षाला मोठे केले असा एकाही नेता पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नाही. त्यामुळे येणा-या काळात नेत्यापेक्षा समाज एकवटणे आरक्षणाच्या हिताचे असणार आहे. एकजूट राहा विजय हा मराठ्यांचाच आहे. मराठ्यांंना आरक्षण हे सरकारला द्यावेच लागणार आहे, अशी खंबीर भूमिका त्यांनी मांडली.