26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरआरक्षण टिकवायचे असेल तर भाकरी पलटा

आरक्षण टिकवायचे असेल तर भाकरी पलटा

लातूर : प्रतिनिधी
आज देशासह राज्यातही द्वेषाचे राजकारण केले जात आहे. द्वेष पेरला जात आहे. जे पेराल ते उगवार असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. आजचे राजकारणी हे भागुबाई आहेत. भाजपा तर अधिक भित्रा आहे. मी आरक्षण बचाव यात्रा काढली नसतील तर मराठवाडा पेटला असता. आरक्षण टिकवायचे असेल तर भाकरी पलटली पाहिजे, असे आवाहनही वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टिका केली.
व्ही. एस. पॅथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके व त्यांच्या सहका-यांनी दि. २ सप्टेंबर रोजी वंचित बहूजन आघाडीत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रवेश केला. त्यानिमित्ताने दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. पुढे बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, द्वेषाच्या राजकारणामुळे वातावरण गढूळ होत चाललले आहे. हे समाजिकदृ्ष्ट धोकादायक आहे.  हे थांबविण्यासाठी मतदारांनी योग्य भूमिका घेणे आवश्यक आहे.  या कार्यक्रमात विनोद खटके यांनी त्यांच्या सहकार्यांसह वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR