27 C
Latur
Thursday, October 9, 2025
Homeराष्ट्रीयआरटीओला घाबरुन ट्रक पळवला; अन् २०० सिलेंडरचा स्फोट झाला!

आरटीओला घाबरुन ट्रक पळवला; अन् २०० सिलेंडरचा स्फोट झाला!

जयपूर : वृत्तसंस्था
जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावरदा पुलाजवळ भीषण अपघात झाला. गॅस सिलिंडरने भरलेल्या एका ट्रकला धडक दिल्यानंतर केमिकल टँकर पलटी झाला, ज्यामुळे लागलेल्या आगीमुळे गॅस सिलिंडरचे सलग स्फोट झाले. या भयंकर दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सुमारे २० हून अधिक वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले. स्फोटांमुळे परिसरात घबराट होती आणि आकाशात धुराचे मोठे लोट दूरवर दिसत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-अजमेर हायवेवर दोन ट्रकमध्ये समोरून टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर एका ट्रकला भीषण आग लागली आणि त्याचवेळी गॅस सिलिंडरने भरलेला दुसरा टँकर पलटी झाला. टँकर पलटी होताच आग आणखी भडकली आणि सिलिंडरचे जोरदार स्फोट होऊ लागले. त्यांचा आवाज जवळपास १० किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर अनेक सिलिंडर उडून आजूबाजूच्या शेतात आणि परिसरात पडले.
राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दु:खद घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्याशी फोनवरून चर्चा करून सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री शर्मा यांनी उपमुख्यमंत्री डॉ. प्रेम चंद बैरवा यांना तातडीने घटनास्थळी पाठवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR