25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रआरोग्य विभागातील ‘व्हॅन’ खरेदीत घोटाळा

आरोग्य विभागातील ‘व्हॅन’ खरेदीत घोटाळा

मुंबई : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली आहे. पण या व्हॅन दुप्पट-तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे, याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृहासमोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली. एका व्हॅनची किंमत ४० लाखांच्या वर होऊ शकत नाही. या व्हॅनमधील यंत्र ही १२ लाखांच्या किमतीपेक्षा अधिक नाहीत. असे असताना वाहने खरेदी करताना अधिकच्या किमतीने घेण्यात आली आहेत. कॅन्सर जीवघेणा आजार आहे, त्याच्या संबंधित व्हॅन आहेत, त्यातील काही यंत्रं बंद पण पडली आहेत. या खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे याबाबत चौकशी सुरू आहे. अजून अहवाल देखील आला नाही मग नेमके काय सुरू आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

अधिवेशन संपण्याच्या आत हा अहवाल सभागृहासमोर मांडला पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी या प्रकरणी चौकशी अधिवेशन संपण्याच्या आत पूर्ण करून अहवाल सदनासमोर मांडण्याचे निर्देश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR