परभणी : प्रतिनिधी
परभणी येथील आर.पी. हॉस्पिटलमध्ये एका तासात सहा प्रसूती यशस्वी करण्यात आल्या आहेत. अत्यांत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करुन एका तासात ६ महिलांना जीवनदान देण्यात आले आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊसामुळे जिल्हा महिला रुग्णालयात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिला यांची प्रसूती करण्यास अडथळे निर्माण झाले होते. गर्भवती महिला रुग्णापैकी काही महिला रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तात्काळ डिलिव्हरी (प्रसूती) ची आवश्यकता होती. सदरील महिला रुग्णा पैकी ६ गर्भवती महिला रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना तात्काळ परभणी येथील अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या आर.पी हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री सुमारे १२ वाजता दाखल करण्यात आले होते. हॉस्पीटल मधील सर्व डॉक्टर आणि कर्मचा-यांनी तत्काळ नियोजन करून एका तासाच्या कालावधीत ६ प्रसूती यशस्वीरीत्या मोफत केल्याबद्दल आ.राहुल पाटील यांनी सर्व डॉक्टर आणि कर्मचा-यांचे कौतुक केले.
सदरील प्रसूती या एकाच वेळी हॉस्पीटल मधील ६ ऑपरेशन थेटर मध्ये करण्यात आल्या. यातील ४ गर्भवती मातांची तब्येत जास्त नाजूक असल्याने प्रसूती दरम्यान गर्भवती स्त्रियाच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पीटल मधील ब्लड बँक मार्फत रक्त देण्यात आले. तसेच एका गर्भवती मातेने दोन जुळ्या बालकांना जन्म दिला असून या बालकांचे वजन कमी असल्याने आणि त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळे बालरोग तज्ञ डॉ. अजय गिरी व डॉ.बाबासाहेब गायकवाड यांनी नवजात अर्भकाना हॉस्पिटल मधील अत्याधुनिक अतिदक्षता विभागा मध्ये दाखल करून त्यांचा जीव वाचवला.
हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि कर्मचा-यांनी दाखवलेल्या कार्यकुशलतेमुळे सर्व नवजात बालके आणि त्यांच्या मातांची प्रकृती स्थिर असून येणा-या काळात प्रसूती माता मृत्यू दर रोखण्यासाठी आर.पी. हॉस्पीटल हे सक्षमपणे आपली प्रमुख भूमिका बजावणार असल्याचे आर.पी. हॉस्पीटल चे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांनी सांगितले.
तसेच डॉ प्रमोद शिंदे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमीर तडवी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.भीमराव कणकुटे, डॉ.कृष्णा पवार,डॉ.प्रियांका सुरडवार, डॉ.फरा अमीर तडवी, फिजिशन डॉ.शहाजी बोडखे, भुलतज्ञ डॉ.श्रुती शहारे, डॉ.श्वेता, डॉ.प्रतिष्ठा कुमारी,डॉ.अरबाज शेख, समुपदेशक स्वप्नील बोर्डे,ओ.टी इन्चार्ज संध्या आळणी,किशोर नवले,पवन लोंढे, प्रमोद पाढरकर यांचे अत्यंत गंभिर परिस्थीत व एका तासात सहा यशस्वी प्रसुती केल्या बद्दल सर्वांचे अभिनंदन केले.