उदगीर : प्रतिनिधी
भक्तीचा प्रवास सोबतच पर्यावरण रक्षणाचा एक आदर्श मंचही आहे. वारक-यांच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाची जाणीव निर्माण होते आणि शाश्वत विकासासाठीचा मार्ग सुचवला जातो. यासाठी आषाढी वारीनिमित्त पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी मातृभूमी महाविद्यालय, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या वतीने वृक्ष दिंडी काढण्यात आली. पर्यावरण व संस्कृती संवर्धन दिंडीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी शफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुरे, सुधीर पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, किरण होळसंबरे, संतोष जिरोबे यांची उपस्थिती होती. दिंडीची सुरुवात मातृभूमी महाविद्यालयात श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करू करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेसह हातात वृक्षाचे रोपटे घेत दिंडीमध्ये आतिशय ऊत्साहात सहभागी होत पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत दिंडीत सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबरोबरच संस्कृती संवर्धनाच्या जानिवा निर्माण हव्यात तसेच पर्यावरणाचे व संवर्धन विद्यार्थ्यांकडून केले जावे यासाठी मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलच्या वतीने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.हीदिंडी कॉलेज, देगलूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दुधीया हनुमान व नगरपरिषद जात दिंडीचा समारोप मातृभूमी महाविद्यालयात करण्यात आला. संपूर्ण मार्गदर्शन प्रा. उषा कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचलन व प्रस्तावाक प्रा बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार प्रा रणजीत मोरे यांनी मांनले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. शितल पवार, प्रा शिवांगी वट्टमवार, प्रा काळे अस्विनी, प्रा काकरे प्रतीक्षा, ग्रंथपाल उषा सताळकर, रामकिशन भोसले, मादळे प्रदीप, दीपक रणदिवे, दयानंद टाके, विवेक देवर्षे, मयूर मुळे, संगीता दुडे, सय्यद सिमा, प्रकाश गायकवाड, जगदिशा ओंकारे, मुबारक पटेल, अर्चना बिरादार यांच्यासह शिक्षक, शिक्षेत्तर कर्मचा-यांयांनी प्रयत्न केले. यावेळी मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते