23 C
Latur
Friday, August 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइराणवर दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

इराणवर दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

झाहेदान : वृत्तसंस्था
इराणच्या सिस्तान-बलूचिस्तानची राजधानी असलेल्या झाहेदानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला; तसेच १३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच नागरिक आणि तीन हल्लेखोरांचा समावेश आहे.

इराणची सरकारी वृत्तसंस्था मिझान ऑनलाईनने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात बंदूकधा-यांनी झाहेदानमधील ज्युडिशियरी सेंटरला टार्गेट केलं. सकाळी न्यायालयीन कामकाज सामान्यपणे सुरू असताना हा हल्ला झाला.

घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत तिन्ही हल्लेखोरांना ठार मारले. इराणची अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएनेही हल्ल्याची पुष्टी केली आहे आणि परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे.

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु हा परिसर दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादी हिंसाचाराचे केंद्र राहिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR