35 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइस्रायलचा गाझातील हॉस्पिटलवर हल्ला; ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार

इस्रायलचा गाझातील हॉस्पिटलवर हल्ला; ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार

 

अल मावासी : वृत्तसंस्था
इस्रायलने गाझामध्ये नव्याने हल्ले सुरू केल्यापासून आतापर्यंत ७०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलच्या लष्कराने सोमवारी गाझामधील नासेर हॉस्पिटलवर हल्ला करून हमासचा म्होरक्या इस्माईल बारहौमसह दोन जणांचा बळी घेतला होता. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने मृतांचा आकडा ६१,७०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले असून ढिगा-याखाली बेपत्ता हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गाझावरील इस्रायलचे युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५०,०२१ पॅलेस्टिनी ठार झाले असून १,१३,२७४ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. गाझाच्या सरकारी मीडिया कार्यालयाने मृतांचा आकडा ६१,७०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले असून ढिगा-याखाली बेपत्ता हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संघर्षामुळे अनेक महिने विस्थापित झाल्यानंतर अनेक पॅलेस्टिनी आपल्या घरी परतले आणि जानेवारीमध्ये युद्धविरामाला सुरुवात झाली. इस्रायलच्या लष्कराने रविवारी सांगितले की, राफाच्या एका भागावर आक्रमण सुरू केल्याने दक्षिण गाझामधून पॅलेस्टिनींना मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्याचे आदेश दिले जात आहेत.

गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याने नेतझारिम कॉरिडॉरचा काही भाग पुन्हा ताब्यात घेतल्याची घोषणा केली होती. नेतजारिम कॉरिडॉर गाझाला दक्षिण आणि उत्तरेकडे वेगळे करतो. जानेवारीत शस्त्रसंधीच्या सुरुवातीला चकमकीतून सैन्य माघारी गेले होते. तेथे उपस्थित असलेल्या हजारो पॅलेस्टिनींना आता मायदेशी परतल्यानंतर काही आठवड्यांतच मोठ्या प्रमाणात स्थलांतराच्या आदेशांना सामोरे जावे लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR