18.1 C
Latur
Monday, November 24, 2025
Homeलातूरउदगीर नगरपालिका निवडणुक, काँग्रेसला बळकटी

उदगीर नगरपालिका निवडणुक, काँग्रेसला बळकटी

लातूर : प्रतिनिधी
राज्यासह लातूर जिल्ह्यात चार नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणूकीची धामधूम सुरु आहे. उदगीर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी मोठी घडामोड घडली असून बाभळगाव निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहर युवक अध्यक्ष अजय शेटकर, उदगीर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा घोगरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
बाभळगाव निवासस्थानी रविवार दि. २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहर युवक अध्यक्ष अजय शेटकर, उदगीर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा घोगरे यांच्यासह कपिल समगे, ओम काळे, बंटी कद्रे, मनोज हावा, बसवराज शेटकर या पदाधिका-यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी
काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कल्याण पाटील, उदगीर काँग्रेसचे निरीक्षक रवींद्र काळे, माधव कांबळे, पद्माकर उगिले, ज्ञानोबा गोडभरले, विजयकुमार चवळे आदी उपस्थित होते.
या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या तरुण कार्यकर्त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उदगीर शहर आणि तालुक्यातील काँग्रेस संघटना अधिक मजबूत झाली असून, होऊ घातलेली नगरपरिषद निवडणूक आणि आगामी काळात होणा-या पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR