लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-३ – चांगले रस्ते, गटारी, आरोग्याची सुविधा हवी

झोपेतून उठण्याअधीच घंटागाडीवाला स्कॅनिंग करुन जातो; कचरा घरातच

लातूर (प्रतिनिधी ) : स्वच्छतेच्या दृष्टीने आणि एकंदरच आरोग्याचा विषय महत्वाचा असल्याने लातूर शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीक आपापल्या घरात ओला, सुका कचºयाचे संकलन करीत आहेत़ शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील नागरीकही कचºयाचे संकलन करीत आहेत़ परंतू, नागरीक साखर झोपेत असतानाचा घन कचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीवाले प्रभागात येऊन दारावर लावलेल्या युनिकोडचे स्कॅनिंग करुन निघून जातात़ कचरा मात्र घरातच पडून राहातो़ नागरिकांची गैरसोय आणि घन कचरा व्यवसथापनच्या ठेकेदाराचे खिसे भरण्याचा उद्योग नेमके कोण करीत आहे?, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परंतु, याकडे लातूर शहर महानगरपालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नाईलाज म्हणून घरातील कचरा रस्त्यावर टाकावा लागत असल्याचे या प्रभागातील नागरिकांनी ‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात सांगीतले.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये गरुड चौकाचा दक्षीण भाग, बालाजीनगर, संत गोरोबा सोसायटी, दसरा मैदान, शाहूनगर, ज्ञानेश्वर विद्यालय हा भाग येतो़ गरुड चौकाचा दक्षीण भाग अद्यापही मुलभूत सुविधांपासून कोसोदुर आहे़ या भागतील नागरिकांनी समस्या मांडताना गेल्या सात वर्षांत अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे म्हटले़ रस्ते, नाल्या नसल्याने सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत नागरिकांची प्रचंड गैरसोय झाल्याचे म्हणणे होते.

संत गोरोबा सोसायटीतील नागरिकांना कचºयाचा प्रश्न सतावतो आहे़ इस्माईल शेख या तरुणाने सांगीतले, नागरिक झोपीतून उठण्याअधीच घंटागाडीवाले दारावील क्युआरकोडचे स्कॅनिंग करुन निघून जातात़ कचरा घरातच असतो़ घंटागाडीवाल्यांना नंतर फोन करावे लागते़ त्यांनी फोन घेतला तर घेतला, नाहीतर नाही़ नागरीक घरात कचरा किती दिवस साठवून ठेवू शकणार आहेत़ ओल्या कचºयाची दूर्गंधी सुटते़ त्यामुळे आरोग्यावर परिणाम होता़ हे टाळण्यासाठी चक्क रस्त्यावर कचरा टाकावा लागतो.

गुणवंत कांबळे यांनी प्रभागातील समस्या मांडत असताना प्रभागातील रस्ते, नाल्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगीतले़ काही ठिकाणी नाल्या बांधल्या परंतू, त्या नाल्यांना व्यवस्थित उतार दिला नाही़ त्यामुळे नाल्या जागोजागी तुंबल्या आहेत़ तुंबलेल्या नाल्यातून घाण पाणी आणि घाण रस्त्यावर येत आहे़ यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे़ नळाला चार दिवसाला एकवेळ पाणी येते़ पण, खुप कमी वेळ येते़ पथदिव्यांची सोय आहे़ परंतू, देशभाल, दुरुस्तीअभावी पथदिवे बंद पडले आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे मोकाट श्वांनाचा प्रश्न गंभीर आहे़ प्रभागातील संत गोरोबा सोसायटीत मोकाट श्वांनाची संख्या लक्षणिय आहे़ हे श्वान कळपाने फिरतात़ अचानक हिंस्त्र होत चावा घेतात़ मोकाट श्वानांची ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना भिती आहे़ प्रश्न, समस्या खुप आहेत़ पण, त्याकडे लक्षच दिले जात नसेल तऱ़़ त्यामुळे नागरिकांनी सांगणे नकोच, अशी भूमिका घेतली आहे़ दसरा मैदानला मैदान म्हणताच येणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे़ शाहूनगर आणि ज्ञानेश्वर विद्यालयाचा परिसरातही नागरी सुविधांचा अभाव आहे़ चांगले रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातुरात अण्णाभाऊ साठे जयंती सामाजिक उपक्रमांनी गाजली
01:38
Video thumbnail
Latur|'आरक्षणावरून समाजात तेढ नको' – माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे आवाहन
05:23
Video thumbnail
Nanded|संतप्त नागरिकांनी थेट नगरपंचायत कार्यालयातच टाकला कचरा!
01:59
Video thumbnail
Parbhani|थारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; नातेवाईकांचा खुनाचा आरोप
03:58
Video thumbnail
शिवीगाळीनंतरही मोदींचा संयम; 'भरकटलेल्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं कर्तव्य'
03:06
Video thumbnail
Latur|छत्रपती शिवाजी महाराज चौक–दयानंद गेट रस्ता जलमय; वाहनचालकांना करावी लागतेय सर्कस
03:16
Video thumbnail
Latur Police Student Dialogue 2.0 | २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांशी पोलीस साधणार थेट संवाद
06:41
Video thumbnail
Latur News | छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भुयारी मार्ग धोकादायक, नागरिकांचा संताप
03:51
Video thumbnail
Latur|सीताराम नगरात रस्ते जलमय; खड्ड्यांमुळे अपघात वाढले,मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
02:45
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54

Latest news