22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजे भोसलेंना उमेदवारीची प्रतीक्षा

उदयनराजे भोसलेंना उमेदवारीची प्रतीक्षा

दोन दिवसांपासून दिल्ली मुक्कामी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले उदयनराजे भोसले हे सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. भाजपकडून काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील २० लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता. या मुद्यावरून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. परंतु, भाजपने नाराजीची दखल घेतली नाही.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्याने उदयनराजे भोसले यांनी दिल्लीकडे धाव घेतली. परंतु आता २ दिवस उलटल्यानंतरही उदयनराजे भोसले यांना दिल्लीतच अडकून पडावे लागले आहे. उदयनराजे भोसले यांना दिल्लीत अमित शाह यांची भेट घ्यायची होती. आज-उद्या अमित शाहांची भेट मिळेल, असे उदयनराजे यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे उदयनराजे भोसले दिल्लीत थांबून आहेत. शुक्रवारी उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांची भेट मिळेल, असे सांगितले जात होते. परंतु ही भेटदेखील लांबणीवर पडली आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा दिल्लीतील मुक्काम आणखी वाढला आहे. उदयनराजे भोसले यांना अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीत ताटकळत राहावे लागल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीत भर पडण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी महायुतीतूनच विरोध असल्याची चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR