37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयफ्यूचर गेमिंगकडून सर्वाधिक निवडणूक रोख्यांची खरेदी

फ्यूचर गेमिंगकडून सर्वाधिक निवडणूक रोख्यांची खरेदी

मेघा इंजिनिअरिंगने कंपनी दुस-या स्थानावर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सेबॅस्टियन मार्टिनची कंपनी फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस ही १,३६५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ९६६ कोटींसह दुस-या स्थानावर आहे. त्यानंतर रिलायन्स-लिंक्ड क्विक सप्लाय चेन ४१० कोटींसह तिस-या स्थानावर आहे. वेदांता लिमिटेडने ४०० कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले तर आरपी-संजीव गोयंका समूहातील हल्दिया एनर्जी लिमिटेडने ३७७ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.
एस्सेल मायनिंगने २२४.५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड आणि वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनीने २२० कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने १९८ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले तर केव्हेंटर्स फूडपार्क लिमिटेड आणि एमकेजे एंटरप्रायझेसने अनुक्रमे १९५ कोटी आणि १९२.४ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.

भाजपला सर्वाधिक मदत
भाजपला गेल्या ४ वर्षांतील सर्वात जास्त रक्कम इलेक्टोरल बाँड योजनेतून मिळाली. एकूण ६ हजार कोटींहून अधिक रक्कम भाजपाला मिळाली. हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंगने भाजपचे सर्वाधिक जास्त इलेक्टोरल बाँड खरेदी केले, त्यांनी ५१९ कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले. त्यानंतर केडब्ल्यूआय सप्लायने ३७५ कोटी, वेदांताने २२६.७ कोटी आणि भारती एअरटेलने १८३ कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले. भाजपच्या इतर मोठ्या देणगीदारांमध्ये मदनलाल लिमिटेड (रु. १७५.५ कोटी), केव्हेंटर्स फूडपार्क इन्फ्रा (रु. १४४.५ कोटी) आणि डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स (रु. १३० कोटी) यांचा समावेश आहे.उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी वैयक्तिकरित्या भाजपला ३५ कोटी रुपयांची देणगी दिली तर इतर अनेकांनी १०-२५ कोटी रुपयांची देणगी दिली.
तृणमूल कॉंग्रेस दुस-या क्रमांकाचे लाभार्थी
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हा दुसरा सर्वात मोठा लाभार्थी पक्ष आहे, ज्याने फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसकडून सर्वात मोठी देणगी मिळाली. त्याची किंमत ५४२ कोटी रुपये होती. हल्दिया एनर्जी (रु. २८१ कोटी), धारिवाल इन्फ्रा (रु. ९० कोटी) आणि एमकेजे एंटरप्रायझेस (रु. ४५.९ कोटी) हे देखील तृणमूलचे मोठे देणगीदार होते.
कॉंग्रेसचा तिसरा क्रमांक
काँग्रेस पक्ष तिस-या क्रमांकावर आहे. वेदांतने सर्वात जास्त १२५ कोटी रुपये, त्यानंतर वेस्टर्न यूपी ट्रान्समिशन कंपनी ११० कोटी, एमकेजे एंटरप्रायझेस ९१.६ कोटी, यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ६४ कोटी आणि अविस ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड (५३ कोटी रुपये), फ्युचर गेमिंगनेही काँग्रेसला ५० कोटी रुपयांची देणगी दिली.

बीआरएसलाही मदत : एमईआयएल ही तेलंगणा-आधारित भारत राष्ट्र समितीसाठी १९५ कोटी रुपयांची देणगी देणारी सर्वात मोठी देणगीदार कंपनी होती. यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने बीआरएसला ९४ कोटी रुपयांची देणगी दिली तर चेन्नई ग्रीन वुड्स प्रायव्हेट लिमिटेड (रु. ५० कोटी), डॉ. रेड्डीज लॅब्स (३२ कोटी) आणि हेटेरो ड्रग्स लिमिटेड (३० कोटी) यांचा समावेश आहे.

द्रमुक : द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) साठी फ्युचर गेमिंगने ५०३ कोटी रुपयांची देणगी दिली. त्यानंतर मेघा इंजिनिअरिंगने ८५ कोटी रुपयांची देणगी दिली. वेस्टवेल गॅसेसने ८ कोटी, आस्कस लॉजिस्टिक्सने ७ कोटी आणि फर्टिलँड फूड्सने ५ कोटी रुपयांची देणगी दिली. यासोबतच इतर राजकीय पक्षांचेही रोखे खरेदी करून आर्थिक मदत केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR