उद्धव ठाकरेंचा हात सोडताच ओमराजेंना मोठा धक्का! हजारो फॉलोअर्सनी केले अनफॉलो

धाराशिव : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ने मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवमध्ये सोशल मीडियावर सक्रिय आणि लोकप्रिय असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिमेला या घडामोडींमुळे फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून जवळपास २० हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. तसेच फेसबुकवरही सुमारे ६ हजार लोकांनी त्यांना अनफॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तरुण वर्गाकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाऊन वेगळा गट स्थापन केला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र प्रत्यक्ष बैठकीला केवळ चार खासदार उपस्थित राहिले होते, तर उर्वरित खासदार ऑनलाईन सहभागी झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा वेगाने सुरू झाली होती.

या बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांतच अनेक खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. बंडखोरीनंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समर्थक संतप्त झाले असून, त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात सोशल मीडियासह विविध माध्यमांतून नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ‘गद्दार’ अशी टीका करत निषेध नोंदवण्यात आला.

सोशल मीडियावरील आकडेवारीतही या नाराजीचे प्रतिबिंब दिसून येत आहे. डिजिटल माध्यमांवरील लोकप्रियता ही आजच्या काळात नेत्यांच्या जनाधाराचे महत्त्वाचे मोजमाप मानली जाते. अशातच, ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्याच्या चर्चेनंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. आता पुढील काळात ते या परिस्थितीचा सामना कसा करतात आणि आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा पुन्हा मजबूत करण्यात कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news