32.3 C
Latur
Monday, March 16, 2026
Homeउद्योगउद्योगपती अनिल अंबानी यांचे आलिशान घर जप्त

उद्योगपती अनिल अंबानी यांचे आलिशान घर जप्त

मनी लॉंड्रिंगच्या आरोपावरून ईडीची कारवाई
मुंबई : प्रतिनिधी
देशातील आघाडीच्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई करीत त्यांचे मुंबईतील आलिशान निवासस्थान ऍबोड जप्त केले. या आलिशान घराची किंमत अंदाजे ३७१६.८३ कोटी एवढी असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली. ईडीने या संदर्भात तात्पुरते जप्तीचे आदेश जारी केले आहेत.

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित एका कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित हा खटला आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. ऍबोड नावाची ही आलिशान इमारत पाली हिलमध्ये आहे. ६६ मीटर उंच, १७ मजली इमारत देशातील सर्वांत महागड्या खाजगी मालमत्तांपैकी एक मानली जाते. ईडीच्या मते, अनिल अंबानी आणि त्यांच्या समूह कंपन्यांविरुद्ध आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई १५ हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्देशानंतर तपासाला वेग
सर्वोच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला ईडीला रिलायन्स कम्युनिकेशन्स त्यांच्या मूळ कंपन्या आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात बँक फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR