एआयच्या मदतीने पंढरपुरात ३२ लाख भाविकांची मोजणी

सोलापूर ग्रामीण पोलिसांचा देशातील पहिला अभिनव प्रयोग
पंढरपूर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचा आषाढी एकादशी सोहळा शनिवारी पार पडला. आषाढी वारी २०२६ मध्ये सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून तीन दिवसात तब्बल ३१ लाख ९८ हजार १२९ म्हणजेच सुमारे ३२ लाख भाविकांची मोजणी करण्यात आली. पारंपरिक मोजणीतील त्रुटींवर मात करत ड्रोन, एआय कॅमेरे आणि क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंगच्या सहाय्याने गर्दी व्यवस्थापनाचा देशात एक आदर्श निर्माण करण्यात आला.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सेंटेंटलॉजिक्स या तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने कॉगनेटिव्ह व्हिज्युअल ुमन न्यूरल एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर शहरात प्रवेश करणा-या प्रत्येक भाविकाची युनिक ओळख तयार करून अचूक मोजणी करण्यात आली. एआय प्रणालीच्या नोंदीनुसार २४ जुलै रोजी ६ लाख ७५ हजार २७४, २५ जुलै अर्थात आषाढी एकादशीच्या दिवशी १८ लाख ९६ हजार ५७३ तर २६ जुलै रोजी ६ लाख २६ हजार २८२ भाविकांनी पंढरपूरमध्ये प्रवेश केला. या ३ दिवसांत एकूण ३१ लाख ९८ हजार १२९ भाविकांनी पंढरीत आगमन केल्याची नोंद झाली.

विशेष म्हणजे, एखादा भाविक शहरातील विविध भागांत फिरत असताना वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमे-यांत दिसला तरी त्याची पुन्हा मोजणी झाली नाही. क्रॉस-कॅमेरा ट्रॅकिंग तंत्रज्ञानामुळे एकाच व्यक्तीची एकच नोंद ठेवण्यात आली. तसेच एखादी व्यक्ती शहराबाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करत असल्यास एआय प्रणालीने आधीच्या ओळखीची पडताळणी करून दुबार नोंद टाळली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नागरिकांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अ‍ॅक्ट तसेच डीजीपीआर नियमावलीनुसार कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र किंवा वैयक्तिक माहिती सर्व्हरवर साठविण्यात आलेली नसल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रमुख प्रवेश मार्गांवर
अत्याधुनिक एआय कॅमेरे
या प्रकल्पासाठी पंढरपूर शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर अत्याधुनिक एआय कॅमेरे बसविण्यात आले होते. सरगम चौक-इंदिरा गांधी चौक, तीन रस्ता-दगडी पूल, गोपाळपूर पूल, सावरकर चौक-मिलिटरी हॉस्टेल तसेच सांगोला चौक या प्रवेशद्वारांवरून शहरात येणा-या प्रत्येक व्यक्तीची चेह-याची ठेवण, कपड्यांचा रंग, टोपी, पगडी यांसारख्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून स्वतंत्र डिजिटल ओळख तयार करण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|MH-CET पेपरही फुटला? 99 पर्सेंटाइलवरून काँग्रेसचा मोठा आरोप!
02:16
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये चोरट्यांचा धडाका! एका रात्रीत सलग चार दुकाने फोडली
01:52
Video thumbnail
८ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व तपासणी शिबिर
13:50
Video thumbnail
Solapur|उजनी धरण 100 टक्के भरले; भीमा नदीत विसर्ग सुरू
00:23
Video thumbnail
Nanded|हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप!
08:31
Video thumbnail
Latur|१ ऑगस्टपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा; मातंग समाजाचा इशारा
05:28
Video thumbnail
Latur|किड्स इन्फो पार्कजवळ एसटी आणि स्कूल बसचा अपघात; काही जण किरकोळ जखमी!
00:40
Video thumbnail
Latur|वाहतूक कोंडीला ब्रेक लावण्यासाठी लातुरात मोठा ड्राइव्ह; अतिक्रमणावर कारवाई सुरू!
02:58
Video thumbnail
Nanded|डिजिटल अरेस्टच्या नावाने सायबर ठगांचा नवा डाव; नांदेडमध्ये ५१ लाखांची फसवणूक
03:31
Video thumbnail
Latur|आरक्षणाच्या मुद्द्यावर नगरसेवकही रस्त्यावर; महामोर्चात सक्रिय सहभाग!
03:13
Video thumbnail
Latur|आरक्षण उपवर्गीकरणासाठी लातूरमध्ये हजारोंचा एल्गार; महामोर्चाला मोठा प्रतिसाद!
03:32
Video thumbnail
CJP Protest|विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट? शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा
12:07
Video thumbnail
Latur|लातुरात गोर बंजारा कवींचा जल्लोष; मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कवी संमेलनाचे उद्घाटन!
00:43
Video thumbnail
Latur|मराठवाड्याच्या वीर सुपुत्राला मानवंदना; पानगावात कारगिल शहीद बालाजी माले यांचे स्मरण!
01:11
Video thumbnail
Latur|विठुरायाच्या भक्तांसाठी मनसेची सेवा; अन्नछत्रासह मोफत आरोग्य तपासणी!
02:53

Latest news