18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeआरोग्य‘एचएमपीव्ही’मुळे ९ लाख कोटी पाण्यात!

‘एचएमपीव्ही’मुळे ९ लाख कोटी पाण्यात!

मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन महिन्यापासून सतत चढ-उताराने हैराण झालेला गुंतवणूकदार आता देशात ‘एचएमपीव्ही’ चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शेअर बाजारात गोंधळात पडला आहे. सेन्सेक्स ११५० अंकांनी घसरुन ७८०६५ अंकांवर घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही ३६० अंकांनी घसरला आणि २४००० च्या खाली २३,६३३ अंकांवर घसरला. बँकिंग आणि ऊर्जा समभागांमध्ये मोठी घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही मोठी घसरण झाली. बाजारातील अस्थिरता मोजणारा निर्देशांक इंडिया विक्स १३.३७ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

कोरोनाची आठवण : कर्नाटकातील बेंगळुरू येथे ‘एचएमपीव्ही’चा पहिला रुग्ण असल्याची बातमी सकाळी समोर येताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली. हा विषाणू सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला. एचएमपीव्ही प्रकरणानंतर बाजारातील गुंतवणूकदारांना ५ वर्षांपूर्वी चीनमधून आलेल्या ‘कोरोना’ची आठवण झाली. त्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण आहे. बीएसई सेन्सेक्स १२०० अंकांच्या घसरणीसह २३,६१० अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टी जवळपास ४०० अंकांनी १.६२ टक्क्यांनी घसरला आहे.

लाखो कोटींचे नुकसान : कर्नाटकात ‘एचएमपीव्ही’ रुग्ण आढळल्यानंतर गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईच्या बाजार भांडवलात ९ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली. ‘बीएसई’ वर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप ४४०.७४ लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मागील सत्रात ४४९.७८ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच बाजार भांडवलात ९.०४ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

मिड-कॅप, स्मॉल-कॅपला फटका : मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली. निफ्टीचा मिड-कॅप निर्देशांक ११०३ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे तर स्मॉल-कॅप निर्देशांक ४१३ अंकांनी खाली आला. याशिवाय बँकिंग शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून येत असून निफ्टी १.६६ टक्क्यांनी घसरत आहे. एफएमसीजी, एनर्जी हेल्थकेअर, एफएससीजी आणि तेल, गॅसच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR