नवी मुंबई : प्रतिनिधी
फळांचा राजा असलेल्या आंब्याचा सीझन पुढील एक-दीड महिन्यात सुरू होणार. यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी आज मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली आहे. कोकणातून आलेल्या यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असून याची विधिवत पूजा करण्यात आली असून यंदा चांगला भाव मिळेल; अशी अपेक्षा येथील फळ व्यापा-याने व्यक्त केली.
उन्हाळ्यात आंब्याचा सीझन सुरू होत असतो. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचे आंबे विक्रीसाठी बाजारात येत असतात. त्यातच केसर, हापूस आंब्याला अधिक पसंती राहत असून भाव अधिक असला तरी देखील केशर आंबा खरेदी केला जात असतो.
सीझन सुरू होण्यास काही दिवस बाकी असले तरी यंदाच्या हंगामातील केसर आंब्याची पहिली पेटी एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या पहिल्या पेटीला १५ ते १६ हजार रुपयांचा भाव मिळेल; अशी अपेक्षा यावेळी व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.