24.1 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्र‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या प्रांजलीचा डबल सुवर्ण धमाका!

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या प्रांजलीचा डबल सुवर्ण धमाका!

पुणे : प्रतिनिधी
एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या १०वी वरिष्ठ गट राष्ट्रीय मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या स्ट्रोक महिला सांघिक गटात व श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाल विद्यापीठ, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ मिनि गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरी स्ट्रोक गटात सुवर्णपदक पटकावत दैदिप्यमान कामगिरीची नोंद केली आहे.

प्रांजलीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ६ खेळाडूंच्या संघात सर्वांत कमी ६२ गुण घेत सर्वोत्तच कामगिरीची नोंद केली. महाराष्ट्र पाठोपाठ मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश संघांनी रौप्य व कांस्य पदक पटकाविले.

यासह अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेतही कामगिरीत सातत्य ठेवताना दैदिप्यमान कामगिरीची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. प्रांजली ही एमआयटी एडीटी विद्यापीठाची अत्यंत हुरहुन्नरी खेळाडू असून तिने काही महिन्यांपूर्वीच ३७ व्या राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्य व जेजेटीयू विद्यापीठ झुंझनू, राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पदक देखील पटकाविले होते. प्रांजली या या सुवर्ण कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस., प्र.कुलगुरू डॉ.मोहित दुबे, डॉ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.पद्माकर फड, डॉ.सुराज भोयार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR