22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यएम्सचे संशोधन : कोविडमधून बरे झालेल्यांत १९ आजारांची लक्षणे

एम्सचे संशोधन : कोविडमधून बरे झालेल्यांत १९ आजारांची लक्षणे

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अलीकडेच, एम्सने एका संशोधन अहवालात मोठा खुलासा केला आहे की, लाँग कोविडमधून बरे झाल्यानंतरही ७० टक्के लोकांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास दिसून आला आहे.

पोस्ट-कोविड-१९ सिंड्रोमची लक्षणं आणि त्याच्याशी संबंधित धोके ‘एम्स’च्या संशोधनात आढळली. त्यामध्ये फुफ्फुसे नीट काम करू शकत नाहीत. याशिवाय आहारातील बदलाचाही कोरोनाबाधितांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानसिक बदल आणि झोप नीट लागत नसल्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. लाँग कोविडशी संबंधित २०० हून अधिक लक्षणे आढळून आली आहेत. कालांतराने लक्षणे तशीच राहू शकतात. आणखी वाढू शकतात किंवा निघून जाऊ शकतात आणि नंतर परत येऊ शकतात.

जास्त थकवा, विशेषत: एखादी क्रिया केल्यानंतर थकवा जाणवतो. स्मरणशक्ती कमी होते. ज्याला अनेकदा ब्रेन फॉग म्हणतात. चक्कर येणे किंवा चक्कर येतेय असे सतत वाटणे. चव न समजणे किंवा वास न येणे ही लक्षणे दिसतात. झोपेसंबंधित समस्या, श्वास घेताना त्रास होणे, खोकला, डोकेदुखी, जलदगतीने हृदयाचे ठोके, पचनसंबंधित समस्या, बद्धकोष्ठता किंवा पोट फुगणे या समस्यांचा देखील सामना करावा लागतो.

लाँग कोविड असलेल्या काही लोकांना इतर आजार देखील असू शकतात. लाँग कोविडमुळे होणा-या काही आजारांमध्ये मायग्रेन, फुफ्फुसाचा आजार, ऑटोइम्यून आजार आणि क्रोनिक किडनी यांचा समावेश होतो. आर्टेरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि व्हॅस्कुलर बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोरोनाच्या १००० दिवसांत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी घटनांचा धोका वाढल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR