20.4 C
Latur
Monday, November 4, 2024
Homeलातूरऐन दिवाळीत सोयाबीनचे दर गडगडले

ऐन दिवाळीत सोयाबीनचे दर गडगडले

जळकोट : प्रतिनिधी
खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या सोयाबीन पिकांच्या काढणीच्या वेळेस परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यात अनेक शेतक-यांचे सोयाबीन भिजले होते. नंतर सोयाबीन मळणी करून शेतमाल शेतक-यांनी बाजारात नेला असता सोयाबीनचे दर साडेतीन ते चारे  हजारांपर्यंत पदरी पडत असल्याने बळीराजाची दिवाळी अंधारात जात असल्याचे चित्र दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळातच सोयाबीनचे भाव गडगडले असल्याने शेतक-यांंवर आर्थिक संकट कोसळले आहे तर दुसरीकडे ज्या सोयाबीन पासून तेल बनते ते मात्र तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढले आहेत.या मुळे  नागगरिकांत तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
सोयाबीन पीकास चांगला भाव मिळत असल्याने शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला आहे. तालुक्यात जवळपास २० हजार हेक्टरच्या वर सोयाबीनचा पेरा होता. खरीप हंगामामध्ये, कापूस, तूर पिकासोबतच शेतक-यांनी १०० ते १२० दिवसाचे सोयाबीनची पीक लागवड केली होती. शासनाने ठरवून दिलेला सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये डोळ्यांसमोर ठेवून शेतक-यांनी कष्टाच्या जोरावर एकरी चार ते पाचकिं्वटल सोयाबीन पिकवले.  त्या सोयाबीनवरच संपूर्ण शेतक-यांची मदार असताना बळीराजांनी निघालेले सोयाबीन बाजारपेठेत नेले परंतु शेतक-यांचा भ्रमनिराश होत आहे. सोयाबीनचा ४८९२ रुपये हमीभाव: पण तो हमीभाव केवळ अधिकृत केंद्रावरच दिसून येत आहे त्या ठिकाणी देखील अद्यापही खरेदी सुरू झाली नाही.  आधीच उत्पादन कमी, खर्च जास्त व त्यात सोयाबीनला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतात सोयाबीन पीक बहरत असतांना काही दिवसापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका सोयाबीनला बसला आहे, या पावसामुळे सोयाबीनचा दर्जा खालावला आहे. अनेक शेतक-यांचे सोयाबीन काळे पडले आहे. तर शेतात काढून ठेवलेल्या  सोयाबीनला अक्षरशा कोंब फुटले आहेत.  पिकाला फक्त साडे तीन हजार ते चार हजार एवढा मातीमोल भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शेतक-यांंना किमान सोयाबीनला प्रतिक्वींटल सात हजार रुपये भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR