19.4 C
Latur
Sunday, October 12, 2025
Homeलातूरऑटो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

ऑटो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट ते जांब बु बुद्रुक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दि १२ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान ऑटो आणि दुचाकीदरम्यान झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे . मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील शिवाजी बाबुराव गायकवाड व अशोक गवाले हे दुचाकीवरुन जळकोट मार्गे उदगीरला जात होते तर जळकोटकडून एक ऑटोपिकअप जांबकडे जात होता. जळकोट ते जांबच्या दरम्यान जळकोट हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास वर या दोन वाहनाची समोरासमोर धडक झाली. यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले .

या दोघांनाही जळकोट येतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले परंतु त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी उदगीर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचार सुरू असताना शिवाजी गायकवाड ( वय २४ ) यांचा मृत्यू झाला तर अशोक गवाले हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर नांदेड येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळकोट येथील पोलीस ठाण्यात याप्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR