‘ऑपरेशन टायगर’ फेल…?; ओमराजे अद्याप शिंदे गटात जाणार नाहीत

धाराशिव : प्रतिनिधी
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात आज सीबीआय विशेष न्यायालयाने निकालाचे वाचन केले. यावेळी न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व ९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर आता ओमराजे निंबाळकर यांची प्राथमिक प्रतिक्रिया आली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली असून त्यांनी निकाल दुर्दैवी आहे. उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका देखील बदलत आपण तूर्तास शिंदे गटात जाणार नाही. याचा निर्णय मतदार संघात जाऊनच दोन दिवसांत घेण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान, ज्यावेळी निकाल जाहीर झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात होते. त्याचबरोबर तिथे अंबाबाई मंदिर विकास कामांचे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमात अमित शहा देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे हे फोनवर बोलत बाहेर पडताना दिसले. पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर या तिघांची बैठक झाली. त्यात अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री, सीबीआयला या प्रकरणी वरिष्­ठ न्­यायालयात दाद मागण्­यासंदर्भात कार्यवाही करण्­याचे निर्देश दिले आहेत.

आता या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका बदलल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाच्या वाटेवर असलेले ओमराजे निंबाळकर हे तूर्तास तरी शिंदे गटात जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ते याबाबतचा निर्णय मतदार संघात जाऊनच घेणार आहेत. विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील उद्धव ठाकरेंचा फोटो हटवलेला नाही.

२० वर्षे आम्­ही खूप भोगले : अर्चना पाटील
या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या सून अर्चना पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आम्ही २० वर्षे खूप भोगलं. कोणीही उठून आरोप केले. आमच्या कुटुंबाला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला. आमच्­यावर झालेल्­ो आरोप व पद्मसिंह पाटील यांना झालेल्­या अटकेनंतर सासूबाई धक्क्याने गेल्या. पद्मसिंह पाटील यांनी विविध मंत्रिपदे भूषविली होती. कोणताही गुन्­हा केला नसताना त्­यांना तुरुंगवास भोगावा लागला ते खूपच वेदनादायी होते. गृहराज्यमंत्री असणा-या माणसाला प्रचंड वेदना झाल्या. राणा जगजितसिंह यांना सतत गेली २० वर्षे हा तणाव सहन करावा लागला. माझ्­या मोठ्या मुलांवरही याचा मानसिक परिणाम झाला होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news