ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेत करणार प्रवेश

मुंबई/धाराशिव : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले धाराशिवचे उबाठा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार आहे, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.
राज्याच्या राजकरणात काहीदिवसांपाूसन मोठमोठ्या धक्कादायक घटना घडत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाचे ६ खासदार फुटले असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची मोठी चर्चा देशभरात रंगली. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवल्याची चर्चा होत होती. मात्र त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर ओमराजे निंबाळकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्याने ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब झाले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या, पण त्यात यश आले नाही. विरोधकांकडे राजकीय सत्ता आणि आर्थिक बळ दोन्ही आहे. ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही राजकारणात आलो, तेच लोक काँग्रेसच्या काळातही फोफावले आणि भाजपा सरकारच्या काळातही फोफावत आहेत. मर्यादित संसाधनांच्या जोरावर आम्ही किती काळ लढत राहणार? मला मनापासून वाटते की, आता आपणही सत्तेच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ते पुढे म्हणाले, शेतक-यांसाठीच्या साध्या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध नाही; दरवर्षी केवळ अंदाजपत्रके तयार केली जातात. सत्ता पाटील कुटुंबाच्या हातात आहे, ते स्वत: आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत. मग आम्ही फक्त हतबल होऊन बघत राहायचे का?

नि:स्वार्थ काम करणारा शिवसैनिक : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

स्वत:साठी नाहीतर जनतेसाठी नि:स्वार्थ काम करणारा हा लोकप्रतिनिधी खरा कडवट शिवसैनिक आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रामाणिकपणे जनतेचे काम करत आहेङ्घ अशा नि:स्वार्थ खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी मी कायम भक्कमपणे उभा आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रत्येक सुखदु:खात मी सहभागी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी आणि जनतेचे प्रश्नं सोडवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे मी शिवसेनेत स्वागत करतो.

महाराष्ट्रभर माझी प्रतिमा चांगली
२०ह्यार्षांनंतरही पवनराजे प्रकरणात एकही आरोपी दोषी ठरला नाही; सर्वजण निर्दोष सुटले. राजकीय वैमनस्य आणि हत्येचा हेतू असल्याचे न्यायालयाने मान्य केले, तरीही सर्वजण सुटले! खासदार असूनही जर मी माझ्या स्वत:च्या कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकत नसेन, तर सामान्य जनतेसाठी काय आशा उरते? लोक म्हणतात की महाराष्ट्रभर माझी प्रतिमा चांगली आहे, पण केवळ प्रतिमा जपण्यासाठीच मी खासदार झालो आहे का? या लोकांना धडा शिकवण्यासाठीच मी इथे आहे. मी जो काही निर्णय घेईन, त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ लागेल. अनेक जण विचारत आहेत की मी त्यांच्यासोबत जाऊन बसेन का? मी त्यांच्यासोबत जाऊन बसणार नाही; उलट, मी त्यांचा थेट सामना करेन आणि त्यांना जाब विचारेन म्हणूनच मी हा निर्णय घेत आहे. मी कधीही तडजोड करणार नाही आणि त्या कुटुंबासाठी कधीही मते मागणार नाही,” असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE : एकमत कार्यालयातील गणपती बाप्पांची आरती | श्री गणेश आरती | Ekmat Digital
07:25
Video thumbnail
Nanded|ST आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक! नांदेड-नागपूर महामार्गावर 2 तास रास्ता रोको
02:31
Video thumbnail
Latur|मसलग्यात बैलगाडी मोर्चा! शेतकऱ्यांचा महामार्गावर रस्ता रोको, सरकारला इशारा
02:17
Video thumbnail
Latur|देवणी पोलिसांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली! शेतातून महाकाय मगर जेरबंद
00:36
Video thumbnail
Latur|एकमत कार्यालयात गणरायाची आरती; माऊली शिक्षण संस्थेचे गंगाधर आराडले यांची उपस्थिती
02:52
Video thumbnail
Latur|संजीव सोनवणे प्रकरणात मोठी अपडेट! सुसाईड नोटची होणार तपासणी | DYSP समीरसिंह साळवे
02:37
Video thumbnail
AUSA ANDOLAN |लातूरसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा! औशात हजारो महिला रस्त्यावर
03:58
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! संजीव सोनवणे यांच्या मृत्यूप्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
03:31
Video thumbnail
Latur|औशातून दुष्काळाचा एल्गार! तहसील कार्यालयासमोर संभाजी सेनेचे ठिय्या आंदोलन
05:55
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी गोळी झाडून केली आत्महत्या...
01:01
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
23:24
Video thumbnail
Latur|लातूरमधून मुंबईकडे ८००-९०० वाहनं! मराठा आंदोलनाची जोरदार तयारी
04:58
Video thumbnail
Nanded Ganeshotsav 2026 |नांदेडमध्ये गणरायाचे उत्साहात आगमन! घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा विराजमान
02:42
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54

Latest news