लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांनी लातूर परिमंडळांतर्गत येणा-या औद्योगिक वीजग्राहकांशी व्हिसीद्वारे संवाद साधत उद्योजकांना भेडसावणा-या समस्या जाणून घेत लवकरात लवकर निराकरण करण्याच्या सुचना दिल्या. याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करत आमच्या तक्रारींची दखल घंवून आश्वस्त केल्या बद्दल आभार व्यक्त केले. आता औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल, असेही यावेळी औंढेकर यांनी सांगीतले.
लातूर परिमंडळांतर्गत येणा-या बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी लातूर येथून व्हीडोओ कॉन्फर्सिंगद्वारे वार्तालाप करत वीजपुरवठ्याबाबतच्या समस्या जाणून घेतल्या. लातूर जूनी व नवीन एमआयडीसी, माजलगाव, उमरगा येथील औद्योगिक ग्राहकांनी समस्यांचा पाढा वाचत अखंडीत वीजपुरवठयामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने वीजयंत्रणा सक्षम करत अखंडीत वीजपुरवठा मिळावा, वारंवार आऊटेज घेवू नये तसेच त्याची आगावू सुचना उद्योजकोना देण्यात यावी याबाबत सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर यांना गळ घातली. तसेच उद्योगांना नवीन वीजजोडणी लवकरात लवकर देण्यात यावी अशी विनंतीही केली.
वीजग्राहकांना तत्पर अखंडीत व योग्यदाबाची वीज सेवा देण्यासाठी मंडळ कार्यालयामध्ये जिल्हास्तरावर एक स्वतंत्र ’स्वागत सेल’ सुरू करण्यात आलेला आहे. या माध्यमातून उद्योजकांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी अधिका-यांनी तत्परतेने कार्यरत रहावे. लातूर परिमंडळाच्या सर्वच जिल्हयातील उद्योजकांना कायम उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न महावितरण सातत्याने करत असते वीजपुरवठया बाबत काही अडचण असल्यास स्वागत सेलच्या माध्यमातून ती तात्काळ सोडवली जाणार आहे. याबाबत लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी उद्योजकांची एक ही तक्रार प्रलंबीत राहू नये यासाठी विशेष लक्ष द्यावे अशा सुचना सहव्यवस्थापकीय संचालक औंढेकरांनी केल्या आहेत.
औद्योगिक ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यात येईल. तसेच नवीन वीजजोडणी, भार वाढ व इतर सेवा देण्यासाठी थेट ग्राहक दारी जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासह विनाविलंब सेवा दिली जाईल असे आश्वासन औद्योगिक ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींना श्री औंढेकर यांनी दिले. याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करत आमच्या तक्रारींची दखल घंवून आश्वस्त केल्या बद्दल आभार व्यक्त केले. सदर बैठकीस मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, प्रेमसिंग राजपूत व संबंधीत मंडळांचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.