औरंगाबाद नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर होऊनही रेल्वेस्थानकावर मात्र औरंगाबाद रेल्वेस्थानक अशीच पाटी होती. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक कोड कॅप्शन असा असेल. त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानकास आता पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड सीपीएसएन असा राहील.

राज्य सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. शासनाच्या नामांतरच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असता नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. यावेळी नाव बदलले की, काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच आहेत, असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले. त्याचप्रमाणे सर्वोत महत्त्वाचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान अधोरेखीत केला आहे. अलहाबाद आणि औरंगाबाद प्रकरण एकसारखे नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

अशातच आता औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आता स्थानकाच्या नाव बदलाला मंजुरी मिळाल्यानंतर स्थानकावरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून काढत त्यावर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक असे नाव लिहिले जात आहे.

नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या मुजोरीवर अंकुश लावण्यासाठी आता पोलिस प्रशासन सक्रिय झाले आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ऑटो शिस्त मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी या कारवाईची माहिती दिली. बेशिस्त आणि नियमबा रिक्षाचालकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करत कारवाई केली जाणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या मोहिमेअंतर्गत गणवेश, बॅच, लायसन्स आणि रिक्षाची कागदपत्रे नसणे, तसेच प्रवाशांशी अरेरावी करून धोकादायक पद्धतीने रिक्षा चालवणा-या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई नाशिक शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबवण्यात येणार असून नियम मोडणारे रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news