स्पेन विश्वविजेता!

संपूर्ण विश्वाचे रविवारी अमेरिकेतील न्यूजर्सी स्टेडियमकडे लक्ष लागले होते. कारण तेथे फुटबॉल जगतातील सर्वांत मोठ्या महाकुंभाचा अंतिम सामना होणार होता. लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना आणि रॉड्रीच्या स्पेन संघादरम्यान अंतिम लढत होणार होती. ही लढत चित्तथरारक होईल, असा अंदाज होता; पण तो फोल ठरला. हा सामना फुटबॉल इतिहासातील सर्वांत संथ आणि तणावपूर्ण फायनलपैकी एक ठरला. असे असले तरी अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करत फिफा विश्वचषक २०२६ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या फेरॉन टोरेसने १०६ व्या मिनिटाला गोल मारून स्पेनला १६ वर्षानंतर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ९० मिनिटांपर्यंत एकही गोल होऊ शकला नाही.

सामना पेनल्टी शूटआऊटकडे सरकत असतानाच टोरेसने स्पेनसाठी २० व्या प्रयत्नात गोलकोंडी तोडली. यानंतर मैदानात धसमुसळा खेळ सुरू झाला. अर्जेंटिनाच्या खेळाडूंचा संयम सुटल्याने खेळाडूंमध्ये हाणामारी आणि ढकलाढकली सुरू झाली. या ऐतिहासिक सामन्यात दोन्ही संघांच्या प्रमुख खेळाडूंची जादू चालली नाही. ‘मेस्सी मॅजिक’ दिसली नाही तर स्पेनचा लॅमिन यामलही फिका पडला. ब्राझीलचा महान खेळाडू कॅफू याच्या नंतर ३ विश्वचषक स्पर्धांचा अंतिम सामना खेळणारा मेस्सी जगातील दुसरा खेळाडू ठरला; मात्र या सामन्यात तो पूर्णपणे ‘ऑफकलर’ दिसला त्यामुळे तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. ३९ वर्षीय मेस्सीचे अर्जेंटिनाला तिस-यांदा विश्वचषक जिंकून देण्याचे त्याचे स्वप्न भंगले. स्पेनचा युवा स्टार लॅमिन यामल यालाही अर्जेंटिनाच्या बचाव फळीने बांधून ठेवले होते; परंतु या संपूर्ण स्पर्धेत स्पेन संघाचा अभेद्य बचाव सर्वांत उठून दिसला. एकूण ८ सामन्यात या संघाने अवघा एक गोल खाल्ला आहे. यावरून स्पेनच्या गोलरक्षकाची अफलातून कामगिरी लक्षात येते. अर्जेंटिना संघाला आक्रमक खेळ करताच आला नाही. उलट त्यांच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

९० मिनिटांपर्यंत त्यांना गोल जाळ्याच्या दिशेने एकही फटका मारता आला नाही. सामना हातातून निसटत आहे हे लक्षात आल्यानंतर मेस्सीचे सहकारी स्पेन खेळाडूंच्या जर्सी ओढण्यात आणि धक्के मारण्यात व्यस्त दिसले. भरपाई वेळेत स्पेनच्या कुबार्सीला चुकीच्या पद्धतीने पाडल्याबद्दल अर्जेंटिनाच्या एन्झो फर्नांडिसला रेड कार्ड दाखवण्यात आले त्यामुळे अर्जेंटिना संघाला १० खेळाडूंसह खेळावे लागले. दोन्ही संघाचे प्रमुख खेळाडू चमकले नसले तरी स्पेनचे बदली खेळाडू हिरो ठरले. टोरेस आणि निको विल्यम्स या बदली खेळाडूंनी उत्तरार्धात मैदानात वेगवान ऊर्जा आणली आणि सामना स्पेनच्या बाजूने झुकवला. स्पेनला विश्वचषक जिंकून देण्यात मुख्य प्रशिक्षक ६५ वर्षीय लुईस डी ला फुरंडे यांचा मोठा वाटा आहे. ते इतिहासातील सर्वांत वयस्कर प्रशिक्षक ठरले आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी व्हीआयपी बॉक्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफा प्रमुख गियानी इन्फँटिनो उपस्थित होते. सामन्याचा पूर्वार्ध इतका संथ होता की, फुटबॉलपेक्षा हाफ टाईममधील मनोरंजनच चाहत्यांच्या लक्षात राहिले असेल. हाफटाईम शोमध्ये मॅडोना, जस्टीन बीबर आणि प्रसिद्ध काल्पनिक प्रशिक्षक टेड लॅसो उपस्थित होते. शकिराने तिची प्रसिद्ध गाणी सादर केली. मैदानातील
मोठ्या स्क्रीनवर ‘डायनामाईट’ आणि ‘लाईट इट अप’ असे शब्द चमकत होते; मात्र मैदानावरील दोन्ही संघ शांतच दिसत होते. सामन्याच्या प्रारंभापासून स्पेनने चेंडूवर ताबा ठेवत अर्जेंटिनाला दबावाखाली ठेवले होते.

अर्र्जेंटिनाचा गोली मार्टिनेझने अनेक वेळा स्पेनचे आक्रमण थोपवल्याने सामना गोल शून्य स्थितीत राहिला. जादा वेळेच्या दुस-या हाफमध्ये विल्यम्सने दिलेल्या अचूक पासवर टोरेसने गोल करत स्पेनचा विजय निश्चित केला. गोल बरोबरी साधण्यासाठी अर्जेंटिनाने शर्थीचे प्रयत्न केले; पण स्पेनचा अभेद्य बचाव ते भेदू शकले नाहीत. स्पेनच्या शिस्तबद्ध खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. स्पेनचे हे यश त्यांच्या फुटबॉल संस्कृतीचा आणि नवीन पिढीच्या गुणवत्तेचा विजय मानला जात आहे. स्पेन संघाचा अभेद्य बचाव तर आहेच; पण ते ‘टिकी-टाका’ खेळासाठी प्रसिद्ध आहेत म्हणजे ते छोटे छोटे पास देत प्रतिस्पर्ध्याला चकवण्यात माहिर आहेत. यंदाच्या स्पर्धेत फिफातर्फे एकूण ८४०० कोटींची बक्षीसे वितरित केली जाणार आहेत. विजेत्या स्पेन संघावर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला आहे. विश्वविजेतेपद मिळवल्याबद्दल त्यांना सुमारे ४९० कोटी (५.१ कोटी डॉलर्स), उपविजेत्या अर्जेंटिना संघाला ३१७ कोटी (३.३ कोटी डॉलर्स), तिस-या क्रमांकावरील संघाला २७९ कोटी तर चौथ्या क्रमांकावरील संघाला २५९ कोटी मिळणार आहेत. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच चॅम्पियन संघातील खेळाडू आणि कर्मचा-यांना ट्रॉफी आणि गोल्ड मेडलसोबतच चॅम्पियनशिप रिंगदेखील दिली जाणार आहे.

यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे ठरला. मेस्सीला मागे टाकत तो ‘गोल्डन बुट’चा मानकरी ठरला. एम्बाप्पेने संपूर्ण स्पर्धेत सर्वांधिक १० गोल केले आहेत. सलग दुस-यांदा त्याने हा पुरस्कार पटकावला आहे. स्पेनचा गोलरक्षक सिमोन सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरला. फक्त एकदाच त्याचा बचाव भेदण्यात आला. त्याला ‘गोल्डन ग्लव्हज’चा पुरस्कार देण्यात आला. मधल्या फळीतील स्टार खेळाडू म्हणून स्पेनच्या रॉड्रीला ‘गोल्डन बॉल’चा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून स्पेनचा युवा बचावपटू पाऊ कुबार्सी याची निवड करण्यात आली. अंतिम सामन्यातील पराभवासह अर्जेंटिनाचा अत्यंत खडतर विश्वचषक मोहिमेचा शेवट झाला. स्पर्धेदरम्यान संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले त्यामुळे बाद फेरीत कोच स्कालोनी यांना संघात अनेक बदल करावे लागले. पराभवानंतर कोच स्कालोनी आणि मेस्सीला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Ganeshotsav 2026|लातूरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; बाप्पांच्या खरेदीसाठी गर्दीच गर्दी
03:25
Video thumbnail
🔴 LIVE : एकमत कार्यालयात गणपती बाप्पांचं आगमन | श्री गणेश आरती | Ekmat Digital
08:54
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री 3 दुकाने अन् बार फोडला
01:32
Video thumbnail
🔴मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE | वर्षावर गणरायाचं आगमन!
07:04
Video thumbnail
🔴LIVE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचं आगमन!
09:57
Video thumbnail
Raj Thackeray LIVE| राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गणरायाचा आगमन
24:13
Video thumbnail
Latur|मराठ्यांच्या वाघिणींची डरकाळी आता मुंबईत! हजारो रणरागिणी जरांगेंच्या सोबत
05:38
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53

Latest news