20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeनांदेडकंत्राटी प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

कंत्राटी प्राध्यापकांचा कुलसचिवांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील घटना

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणा-या दोन प्राध्यापकांनी मानधन न मिळाल्याच्या कारणावरून कुलसचिवाच्या दालनात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथे घडली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्त्री अध्ययन केंद्र येथे तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत प्रा. गजानन इंगोले व प्रा. मेघनाथ खडके यांनी मागील चार महिने केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला वेळोवेळी मिळावा यासाठी वरिष्ठाकडे मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दोन प्राध्यापकांनी कुलसचिवांच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मागील चार महिन्यापासून विद्यापीठाने आमच्याकडून प्रवेश प्रक्रिया याशिवाय अध्ययनाचे काम करून घेतले, कामाचा मोबदला आम्ही मागत होतो. परंतु स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालिका यांनी जाणीवपूर्वक आम्हाला मानधन देण्यापासून टाळले. या अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचे दोन्ही कंत्राटी प्राध्यापकांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR