Homeमुख्य बातम्याकफ सिरप सिंडिकेटवर ईडीची कारवाई; १८९ बोगस कंपन्या

कफ सिरप सिंडिकेटवर ईडीची कारवाई; १८९ बोगस कंपन्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ईडीने अवैध कफ सिरपची तस्करी आणि त्यासंबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर आपली पकड मजबूत करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. देशभरातील विविध शहरांमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची अवैध कमाई, शेकडो बोगस कंपन्या आणि महागड्या वस्तूंचा पर्दाफाश झाला आहे. प्राथमिक तपासात हे एक संघटित आणि मोठ्या प्रमाणावर चालणारे सिंडिकेट असल्याचे समोर आले आहे. ईडीने चार्टर्ड अकाउंटंट विष्णू अग्रवालकडून १४० कंपन्यांचा डेटा प्राप्त केला.

ईडीने झारखंडमधील रांची येथे मेसर्स सेली ट्रेडर्सच्या कार्यालयातून १८९ संशयास्पद बोगस कंपन्यांशी संबंधित कागदपत्र जप्त केली आहेत. या कंपन्यांनी अंदाजे रु.४५० कोटी रुपयांचा खोटा टर्नओव्हर दाखवून अवैध व्यवहार केले होते, असे तपासात उघड झाले.

मुख्य आरोपी शुभम जयस्वालकडे ईडीला प्रादा, आणि गुच्ची सारख्या महागड्या बॅग तसेच राडो आणि ऑडमर्स पिगुएट ब्रँडची घड्याळे मिळाली. त्यांची अंदाजित किंमत १.५ कोटींहून अधिक आहे. घराच्या आतील सजावटीवर १.५ कोटी ते २ कोटी रोख रक्कम खर्च झाल्याचे पुरावे देखील मिळाले आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये निलंबित कॉन्स्टेबल आलोक प्रताप सिंहच्या घरावर छापा टाकण्यात आला.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये मेसर्स आरपिक फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिची उपकंपनी, मेसर्स इधिका लाइफ सायन्सेस यांच्या आवारात छापे टाकण्यात आले. कोडिन-आधारित कफ सिरपची अवैध विक्री आणि गैरवापर तसेच कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराचे पुरावे मिळाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR