15.2 C
Latur
Wednesday, January 7, 2026
Homeमहाराष्ट्रकर महसुलात महाराष्ट्र ‘किंग’; देशाच्या तिजोरीत २२% वाटा

कर महसुलात महाराष्ट्र ‘किंग’; देशाच्या तिजोरीत २२% वाटा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
देशातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात डिसेंबर २०२५ मध्ये वार्षिक ६.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात एकूण १,७४,५५० कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर २०२४ मध्ये हा आकडा १.६४ लाख कोटी रुपये होता. दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांत एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे २२% इतका राहिला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राचे एकूण संकलन २,६६,७२६ कोटी रुपये असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

कर परताव्यात वाढ : डिसेंबर महिन्यात कर परताव्याच्या प्रमाणात ३१ टक्क्यांची मोठी वाढ झाली असून, सरकारने २८,९८० कोटी रुपये परत केले आहेत. देशांतर्गत व्यवहारातून मिळणा-या महसुलात केवळ १.२ टक्क्याची वाढ झाली आहे. मात्र, आयात वस्तूंवरील कर संकलनाने १९.७ टक्क्यांची मोठी झेप घेतल्याने एकूण आकडा समाधानकारक राहिला.

‘सेस’ संकलनात घट : ‘सेस’ संकलनात मोठी घट झाली. लक्झरी आणि अन्य वस्तूंवरून उपकर हटवून तो आता केवळ तंबाखूजन्य पदार्थांवर मर्यादित केल्याने हा आकडा मागील वर्षीच्या १२,००३ कोटींवरून घसरून ४,२३८ कोटी रुपयांवर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR