26.2 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचे १६ उमेदवार ६ वर्षांसाठी निलंबित

काँग्रेसचे १६ उमेदवार ६ वर्षांसाठी निलंबित

मुंबई : काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढवणा-या १६ उमेदवारांचे ६ वर्षांसाठी निलंबन केले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांनी उमेदवार देऊनही काही इच्छुकांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले, अशा बंडखोरांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपमध्येहही ३७ विधानसभा मतदारसंघांतील ४० नेते आणि पदाधिका-यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
निलंबित करण्यात आलेले   उमेदवार

भिवंडी – विलास पाटील आणि आसमा जव्वाद चिखलेकर, मीरा भाईंदर – हुंसकुमार पांडे, कसबा पेठ – कमल व्यवहारे,अहमदनगर शहर – मंगल विलास भुजबळ, कोपरी पाचपाखाडी – मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे, पलूस कडेगाव – मोहनराव दांडेकर, भंडारा – प्रेमसागर गणवीर, अर्जुनी मोरगाव – अजय लांजेवार, उमरखेड – विजय खडसे, यवतमाळ – शबीर खान, राजापूर – अविनाश लाड, कटोल – याज्ञवल्क्य जिचकार, रामटेक – राजेंद्र मुळक, आमरोली- आनंदराव गेडाम आणि शिलु चिमूरकर, गडचिरोली – सोनल कोवे आणि भरत येरमे, बल्लारपूर – अभिलाषा गावतुरे आणि राजू झोडे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR