पुणे : सर्व राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पहिल्यांदाच महायुती व महाविकास आघाडी हे तीन पक्ष एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांच्या इच्छांवर पाणी फिरले. तसेच बंडखोरी देखील वाढली. काँग्रेस पक्षाने पक्षातील या बंडखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
तीन पक्ष मिळून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे मतदारसंघ हे युतीमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये नाराजीनाट्य सुरू असून बंडखोरी वाढली आहे. काँग्रेस पक्षाने पाच बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. पक्षश्रेष्ठींकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये बंड करणा-या पाच नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई थोड्या नाही तर तब्बल सहा वर्षांसाठी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यामध्ये, राजेंद्र मुळीक, कमल व्यवहारे, जयश्री पाटील, याज्ञवल्क्य जिचकर आणि आबा बागुल यांचा समावेश आहे. आबा बागुल हे पुण्यातील काँग्रेस नेते असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.