लातूर : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरा दिवसांपसून नविन कांद्याची आवक सुरु झाली आहे. त्यातच साठवलेल्या जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. मागील आठवडयात ७० ते ८० रुपये किलोने मिळणारा कांदा आता ४० ते ५० रुपयांनी मिळत आहे.
जुन्या कांद्याच्या भावात घाऊक बाजारात मागील आठवडयाच्या तुलनेत घट झाली आहे. तर नवीन कांद्याला प्रतिकिलोला दर्जानुसार भाव मिळत आहे. नवीन कांद्यामुळे भाव घसरतील, या शक्यतेने साठवून ठेवलेला कांदा शेतक-यांनी बाजारात आणण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जुन्या कांद्याची आवक वाढली आहे. परिणामी, कांद्याच्या भावात घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मागील आठवडयात जुन्या कांद्याला किलोला घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये भाव मिळत होता. तो कमी होऊन आता ४० ते ५० रुपये मिळत असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सांगितले.
पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या भावात वाढ होते. मागील रविवारी येथील बाजारात सुमारे ५६५ क्ंिव्टलची आवक झाली होती. त्यामध्ये वाढ झाली असून, रविवारी ६२५ क्व्टिंल आवक झाली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कांद्याची आवक होत आहे. ग्रामीण भागासह शेजारी जिल्ह्यातून व शेजारी राज्यातूनही आवक होत आहे. आणखीन काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यास येत्या ४ ते ५ दिवसात आणखी दर्जेदार नवीन कांदा आजारात दाखल होईल असे व्यापा-यांनी सागीतले.