लातूर : प्रतिनिधी
कलावंतांसाठी महत्वपूर्ण असलेल्या कांस फेस्टिवलमध्ये लातूरचा पुरुषोत्तम वाघ हा कलावंत झळकत आहे. त्यांनी अभिनय केलेला पहिला ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने सर्वांवर भूरळ घातली आहे. कांस फेस्टिव्हलमध्ये सध्या ‘ऊत’ या चित्रपटाचीच चर्चा आहे.
लेखक व दिग्दर्शक राम आर. मलिक यांच्या ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने कान्स फेस्टिवलमध्ये आपली छाप पाडली आहे. हा चित्रपट कथा भावना, प्रेम, संघर्ष याच्याही पुढे जाऊन खूप वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. त्यात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून राम आर. मलिक यांनी बाजी मारली आहे. या सिनेमाची निर्मिती वेरा फिल्मची आहे सांस्कृतिक क्षेत्रातसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या फिल्ममध्ये प्रमूख सहाय्यक अभिनेता म्हणून आणि कास्टिंग डायरेक्टर अशी दुहेरी भूमिका पुरुषोत्तम वाघ यांनी यशस्वी पणे पार पाडली आहे.
‘ऊत’ या मराठी चित्रपटाने राज्यस्तरीय नॅशनल लेवल आणि आता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ही बाजी मारली आहे. २१ मे रोजी ही फिल्म कांस फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट करत असताना पुरुषोत्तम वाघ यांच्यावर राम आर. मलिक यांनी आणि वेरा फिल्मस्ने जो विश्वास ठेवून कास्टिंगची जबाबदारी सोपवली होती ती आज ख-या अर्थाने यशस्वी झाली, असे पुरुषोत्तम वाघ यांनी सांगीतले.
या फिल्ममध्ये राज मिसाळ आणि आर्या सावे यांचे प्रमूख भुमिकेत पदार्पण झालेले आहे. तसेच या फिल्ममध्ये पुरुषोत्तमने ‘नंदू’ नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही व्यक्तिरेखा या फिल्ममध्ये प्रमुख सहाय्यक भूमिका आहे. अजय गोगावले, आदर्श शिंदे, हरिहरन सुब्रमणी यांनी गीत गायन केले आहे. ‘ऊत’ मराठी चित्रपट सन २०्र२५ मध्ये संपूर्ण जगभरामध्ये रिलीज होणार आहे. त्याच्या या यशा बद्दल सर्व मराठवाड्यातून सर्व स्तरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.