मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ सुरू झाल्यापासून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. बुधवारी (२ जून) विधानसभेत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (३ जून) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्ष नव्हे तर सत्ताधारी असलेल्या पक्षातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनीच सरकारला धारेवर धरले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या ऊर्जा विभागाच्या कामावर टीका केली.
राज्यातीलसालियन प्रकरणात राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे : संजय राऊतभाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या ऊर्जा विभागावर टीका केली. शेतक-यांच्या संदर्भातील योजनांची अंमलबजावणी अपुरी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विधानसभेत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘‘शेतकरी विद्युत पंपाची मागणी करत आहेत, पण महावितरणकडून सोलर पंप घ्या असा आग्रह केला जातो. पण, प्रत्यक्षात सोलर पंप वर्षानुवर्षे दिले जात नाहीत.’’ अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तसेच ते पुढे म्हणतात की, ‘‘राज्यात सध्या ४७ हजार सोलर पंपासाठीचे अर्ज प्रलंबित आहेत. कामाचा वेग इतका संथ आहे की, या अधिका-यांना नोबेल पुरस्कार द्यायला हवा,’’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
‘चंद्रपूर जिल्ह्यात सोलर पंप बसवले, पण ते नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठे आहे. सीआरआय कंपनीचे हे सोलर पंप आहेत आणि गुणवत्तेचा अभाव स्पष्ट आहे,’’ अशी टीका भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान सोलरला प्रोत्साहन देतात हे मान्य आहे. पण फक्त शेतक-यांनाच सक्ती का? जर खरोखर सोलरला प्रोत्साहन द्यायचे असेल, तर मंत्रालय सोलरवर चालवा, विधान भवन सोलरवर करा,’’ असा सवाल उपस्थित करत मुनगंटीवारांनी सरकारलाच कोंडीत पडकले. दरम्यान, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर दिले. याबाबत बैठक घेऊ आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. जिथे सोलर चालत नाही तिथे विद्युत कनेक्शन द्यायचा प्रयत्न करू, अशी माहिती त्यांनी दिली.