29.2 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रकारमध्ये सापडले २ कोटींचे घबाड

कारमध्ये सापडले २ कोटींचे घबाड

मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामणवाडी पोलिस चौकीजवळ स्थानिक पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे.
पोलिसांना आज नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणा-या एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत २ कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलिस चौकीजवळ स्थानिक पोलिस कर्मचा-यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत रोख रक्कम आढळून आली आहे. या गाडीत अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली असून वाहन ताब्यात घेऊन भरारी
पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी सुनील बच्छाव, निवडणूक भरारी पथक व टीमकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यात तपासणीदरम्यान ५ कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. त्यानंतर आता शहापूर तालुक्यात २ कोटी रुपयांची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली असून ही रक्कम नक्की कोणाची आहे, याबाबत अधिक तपास केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR