किन्होळा पाटीजवळ ट्रक-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; पाच जण जखमी

परभणी : परभणी ते पाथरी मार्गावरील किन्होळा पाटीजवळ शुक्रवार, दि. ७ आॅगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ट्रक आणि महिंद्रा स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी अक्रम कुरेशी आणि मैफूस सय्यद हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातात महिंद्रा स्कॉर्पिओचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व जखमींवर परभणी येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा ट्रक (एमएच ३८ एक्स ५३६९) पाथरीहून परभणीकडे येत होता. किन्होळा पाटीजवळ रस्त्यावरील खड्ड्यात ट्रकचे टायर गेल्याने वाहनाचा तोल बिघडला. त्यातच स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाºया महिंद्रा स्कॉर्पिओ (एमएच २३ बीएच ५७४७) ला जोरदार धडक बसली.
या अपघातात वसीम कुरेशी, अक्रम कुरेशी, मेहबूब बंसुरी, मैफूस सय्यद आणि अदनान शहा, सर्व रा. मानवत, हे जखमी झाले. ट्रक चालक त्रिंबक वैजनाथ झाडे (वय ३५, रा. टोम पिंपळगाव, ता. जि. परभणी) यांना दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास मानवत पोलीस करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news