22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र‘कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीशी यवतमाळ-वाशिम जिल्हा’

‘कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीशी यवतमाळ-वाशिम जिल्हा’

भावना गवळींच्या समर्थकांची पोस्टरबाजी

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये भावना गवळींच्या समर्थनार्थ एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असल्याची ही पोस्ट व्हायरल असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

भावना गवळींच्या समर्थनार्थ व्हायरल होणा-या पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय? तर ‘कुणी कितीही करू द्या कल्ला, तुमच्या पाठीमागे उभा आहे यवतमाळ-वाशिम जिल्हा’ अशा स्वरूपाची ही पोस्ट आहे. ‘भावना गवळी पाटील फॅन’ या पेजवर ही पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला पेव फुटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR