परभणी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या वतीने कुलगुरू डॉ.इंद्र मणि यांनी दि.१९ रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले.
२३ जानेवारी रोजी विद्यापीठातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात २६ वा दीक्षांत समारोह पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव केंद्रीय मंत्री गडकरी दीक्षांत समारोहास उपस्थित राहू शकले नव्हते.
गडकरी यांनी जैव इंधन विकास, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, पाणी संवर्धन, कृषी विविधकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात आले आहे.