20 C
Latur
Sunday, November 17, 2024
Homeकेदारनाथमध्ये मुसळधार; २५०० भाविक बचावले, १६ जण बेपत्ता

केदारनाथमध्ये मुसळधार; २५०० भाविक बचावले, १६ जण बेपत्ता

 

केदारनाथ : वृत्तसंस्था
केदारनाथ खो-यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास २५३७ भाविकांना वाचविण्यात यश आले आहे. ‘एसडीआरएफ’सोबतच लष्कराचे चिनूक आणि एमआय-१७ हेलिकॉप्टरही बचाव कार्यासाठी उतरले आहे.

केदारनाथ यात्रा मार्गावर १६ लोक बेपत्ता झाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. लिंचोली आणि भिमबली येथे अडकलेल्या लोकांना शेरसी येथे पोहोचवले जात आहे. काही यात्रेकरूंना गौरीकुंडावरून पगडंडी मार्गे सोनप्रयागला आणले. गौरीकुंड ते सोनप्रयाग दरम्यानचा जवळपास १०० मीटर भाग उध्वस्त झाला आहे. डीएम सौरभ गहरवार आणि एसपी विशाखा अशोक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बचाव कार्य सुरू झाले आहे.

भीमबलीच्या जवळपास अडकलेल्या ७३७ यात्रेकरुंना हेलीकॉप्टरच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. तर २०० यात्रेकरूंना रस्त्याने आणण्यात आले. या अभियानात पाच हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

सर्वाधिक यात्रेकरू गौरीकुंडाजवळ अडकलेले आहेत. एसडीआरएफचे कमांडन्ट मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड येथून १७०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही १३०० जण अडकलेले आहेत. अलास्का लाइटच्या मदतीने रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे.

एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये ११०० ते १४०० भाविक, लिंचौलीमध्ये ९५ तसेच भीमबलीमध्ये जवळपास १५० यात्रेकरू अडकलेले आहेत. याशिवाय, कुमाऊंमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंडलमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR